Pakistan’s Arshad Nadeem New Olympic Record: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भालाफेक या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा अर्शद नदीम याने नवा विक्रम रचला आहे. अर्शद हा पाकिस्तानचा उत्कृष्ट भालाफेकपटू आहे. अर्शदने या अंतिम फेरीतील दुसऱ्या प्रयत्नात तब्बल ९२.९७ मी. लांब भाला फेकत नवा ऑलिम्पिक विक्रम केला आहे. याआधी ९० मी. लांब भाला फेकण्याचा विक्रम होता. पण अर्शदने हा विक्रम मोडला. आता तो अंतिम फेरीत पहिल्या स्थानी आहे. तर नीरज ८९.४५ मीटर फेक करून दुसऱ्या स्थानी आहे.

हेही वाचा – Paris Olympics 2024: “सरपंच साहब…” पंतप्रधान मोदींनी विजयानंतर हॉकी संघाला केला फोन, श्रीजेशवर सोपवली नवी जबाबदारी, पाहा VIDEO

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर

भालाफेकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीमही नीरज ते इतर खेळाडूंसाठी मोठे आव्हान ठरतो. नदीमने टोकियो ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. परंतु तो पदक जिंकू शकला नाही. मात्र जागतिक स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले. याशिवाय २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच्या कामगिरीने आश्चर्यचकित करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. याशिवाय नदीमने यापूर्वी ९० मीटरपर्यंत भालाफेक केली आहे, जी नीरज चोप्राने अद्याप केलेली नाही. नदीमचा सर्वोत्तम थ्रो ९०.१८ होता. आता त्याने स्वतचा विक्रम मोडत ९२.९७ मी. भालाफेक करत नवा विक्रम केला आहे.

हेही वाचा – India vs Spain: ग्लोव्हज, हेल्मेटसमोर नतमस्तक अन् मग थेट चढून गोलपोस्टवर बसून श्रीजेशने साजरा केला अखेरच्या सामन्याचा विजय, पाहा VIDEO

पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत ८६.५९ मीटरसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अर्शद नदीमची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्याचा पहिला थ्रो फाऊल झाला. पण दुसऱ्याच थ्रोमध्ये अर्शदने सगळ्यांच्या शंका दूर केल्या इतकंच नाही तर सगळ्यांना चकित केलं. याआधी कारकिर्दीत त्याने एकदाच ९० मीटर थ्रो केला होता, मात्र यावेळी त्याने ९३ मीटरच्या जवळ फेक करून सर्व विक्रम मोडीत काढले.

अर्शद नदीमचे ऑलिम्पिक पदक जवळपास निश्चित झाले आहे. जर त्याने पदक जिंकले तर तो ३२ वर्षांनंतर पाकिस्तानसाठी पदक आणेल. पाकिस्तानने १९९२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये शेवटचे पदक जिंकले होते. जे हॉकी संघाने पटकावले होते. आतापर्यंत पाकिस्तानकडे ८ ऑलिम्पिक पदके आहेत. याआधी मोहम्मद बशीरने १९७६० मध्ये रोममध्ये कुस्तीमध्ये आणि १९८८ मध्ये सोलमध्ये हुसैन शाहने बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

हेही वाचा – अंतिम पंघालने बहिणीला अटक आणि क्रीडा नगरीतून बाहेर काढण्याबाबत दिले स्पष्टीकरण, काय आहे संपूर्ण प्रकरण? पाहा VIDEO

Story img Loader