Paris Olympics 2024: पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नवा विक्रम रचला आहे. भालाफेक स्पर्धेतील त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात त्याने ९२.९७ मीटर भालाफेक केली, हा एक नवीन ऑलिम्पिक विक्रम आहे. या कामगिरीसह नदीमने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. नदीमच्या विजयाने खूश झालेल्या पाकिस्तानी अभिनेता आणि गायक अली जफरने त्याला १ मिलियन बक्षीस रक्कम देण्याचं जाहीर केलं आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटला पदक मिळणार की नाही? याचिकेसंदर्भात आली नवी अपडेट…

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

गुरूवार, ८ ऑगस्ट रोजी पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स येथे खेळल्या गेलेल्या भालाफेक सामन्यात अर्शद नदीमने पहिल्या प्रयत्नात फाऊल केले होते. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने ९२.९७ मीटर भालाफेक करत नवा ऑलिम्पिक विक्रम केला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८८.७२ मीटर भालाफेक केली. त्याने चौथ्या प्रयत्नात ७९.५० मीटर, तर पाचव्या प्रयत्नात त्याने ९१.९७ मीटर भालाफेक केली. यासह पॅरिस ऑलिम्पिक २०२५ मधील भालाफेक स्पर्धेचे सुवर्णपदक पाकिस्तान देशाने पटकावले.

हेही वाचा – Arshad Nadeem New Olympic Record: पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा ऑलिम्पिकमध्ये नवा रेकॉर्ड, तब्बल ९२.९७ मी लांब केला थ्रो

अली जफरने हे सुवर्णपदक जिंकण्याची भविष्यवाणी आधीच केली होती. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानमधील लोकांना २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची विनंती केली होती. अलीने खासकरून अर्शद नदीमचे नाव घेतले आणि नदीम पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठी कामगिरी करेल असा विश्वास असल्याचे सांगितले. आता नदीमने प्रत्यक्षात सुवर्णपदक जिंकल्याने अली जफरने आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra: भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राकडून वारंवार फाऊल थ्रो का होत होता? स्पर्धेनंतर स्वत: सांगितले कारण

१९९२ पासून पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये एकही सुवर्णपदक मिळालेले नाही. पण अर्शद नदीमने पाकिस्तानसाठी एकेरी स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक पटकावलं. अली जफरने अर्शद नदीमबद्दल ट्विट केले आणि म्हणाला, ‘अर्शद नदीमने ९२.९७ भालाफेक करत विक्रम मोडला आणि पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकले. अली फाऊंडेशनच्या माध्यमातून मी त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे.

अभिनेत्याने पुढे लिहिले की, ‘मी पाकिस्तान सरकार आणि सीएम शाहबाज यांना विनंती करतो की नदीमचे हिरो म्हणून स्वागत करण्यात यावे आणि त्याच्या नावाने स्पोर्ट्स अकादमी उघडण्यात यावी. आपल्या खेळाडूंना आणि खेळाला योग्य पाठिंबा मिळाला तर ते एका वर्षात १० सुवर्णपदके जिंकू शकतात.