Arshdeep Singh Won ICC Men’s T20I Cricketer of the Year 2024 Award: आयसीसीने २०२४ मधील सर्वाेत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटूची घोषणा केली आहे. आयसीसीच्या या पुरस्कारासाठी झिम्बाब्वेचा सिंकदर रझा, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि पाकिस्तानच्या बाबर आझमला नामांकन देण्यात आले होते. पण भारताच्या या गोलंदाजाने सर्वांना मागे टाकत आयसीसी २०२४ चा सर्वाेत्कृष्ट टी-२० खेळाडूचा किताब जिंकला आहे.

२०२४ मध्ये भारताचा टी-२० मध्ये आघाडीचा विकेट घेणारा अर्शदीप सिंग याला आयसीसी पुरस्कारांमध्ये ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे. २०२४ मध्ये त्याने चेंडूने अत्यंत चांगली कामगिरी केली होती. अर्शदीप सिंगने २०२४ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. या आयसीसी स्पर्धेत तो भारताचा महत्त्वाचा गोलंदाज ठरला. अर्शदीप सिंग पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

India vs England 2nd T20 Highlights in Marathi
IND vs ENG 2nd T20I Highlights : तिलक वर्माचा विजयी चौकार! टीम इंडियाने सलग दुसऱ्या सामन्यात मारली बाजी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Padma Awards 2025 R Ashwin Honoured with Padma Shri Padma Bhushan for PR Sreejesh
Padma Awards 2025: आर अश्विनला पद्मश्री पुरस्कार, पीआर श्रीजेशला पद्मविभूषण जाहीर; पाहा संपूर्ण भारतीय खेळाडूंची यादी
IND vs ENG Harry Brook Clean Bowled on Varun Chakravarthy in 2nd T20I Despite no Smog
IND vs ENG: “बघ धुकं आहे का?”, हॅरी ब्रुक वरूणच्या गोलंदाजीवर पुन्हा क्लीन बोल्ड, विकेट पाहून झाला चकित; VIDEO व्हायरल
IND vs ENG Nitish Reddy Ruled out of England Series Rinku Singh Injured
IND vs ENG: भारताला दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा धक्का, दोन खेळाडू संघाबाहेर; BCCI ने जाहीर केला सुधारित संघ
Shubman Gill Throws Bat in Anger After Controversial Dismissal in Ranji Trophy
Ranji Trophy: शुबमन गिल वादग्रस्तरित्या बाद झाल्यानंतर संतापला, हवेत फेकली बॅट अन् डोक्याला…, VIDEO व्हायरल
IPL 2025 MI Retention Team Players List
MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

गेल्या काही वर्षांत युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज ठरला आहे. २०२४ मध्येही तो भारताचा टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने गेल्या वर्षी टीम इंडियासाठी १८ टी-२० सामने खेळले आणि एकूण ३६ विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगला आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या T20I टीम ऑफ द इयर २०२४ मध्ये स्थान मिळाले आहे.

दुसरीकडे १७ वर्षांनंतर भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात अर्शदीप सिंगनेही महत्त्वाची भूमिका बजावली. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज होता. त्याने या स्पर्धेत एकूण १७ विकेट घेतल्या. अंतिम सामन्यातही अर्शदीप सिंगने ४ षटकांत २० धावा देत २ विकेटही घेतले, त्यात १९व्या षटकात त्याने केवळ ४ धावा दिल्या. हे षटक भारताच्या वर्ल्डकप विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारं ठरलं.

अर्शदीप सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण नोव्हेंबर २०२२ मध्ये झाले होते. त्याने अवघ्या २ वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही केला आहे. त्याने टीम इंडियासाठी टी-२० मध्ये आतापर्यंत ९७ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या तुलनेत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला हा टप्पा गाठता आलेला नाही. यापूर्वी हा विक्रम युझवेंद्र चहलच्या नावावर होता. युजवेंद्र चहलने टी-२० मध्ये टीम इंडियासाठी ९६ विकेट घेतल्या आहेत. पण अर्शदीपने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला मागे टाकत नवा इतिहास घडवला.

Story img Loader