Arshdeep Singh 3rd highest wicket taker in powerplay : शनिवारी भारत आणि वेस्ट इंडिज संघांत झालेल्या टी-२० सामन्यात भारताने ९ विकेट्सने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने टीम इंडियाला १७९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात जे टीम इंडियाने यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल खेळीच्या जोरावर पूर्ण केले. टीम इंडियाने चौथ्या टी-२० सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. या सामन्यात अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात ३ विकेट्स घेत मोठा कारनामा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्शदीप सिंगने केली अप्रतिम कामगिरी

काइल मेयर्स आणि ब्रेंडन किंग या सलामीवीरांनी वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करून दिली. हे दोन्ही खेळाडू वेगवान फलंदाजी करत होते, त्यानंतर अर्शदीप सिंगने आपल्या पहिल्याच षटकात काइल मेयर्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर त्याने ब्रेंडन किंगलाही बाद केले. भारताला विकेट्सची सर्वाधिक गरज असताना त्याने टीम इंडियासाठी विकेट्स मिळवल्या. या सामन्यात अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३८ धावा देत ३ बळी घेतले.

अर्शदीप सिंगने केला हा विक्रम –

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात ३ बळी घेत अर्शदीप सिंगने एक मोठा कारनामा केला. तो भारतासाठी टी-२० सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत २० विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने भारतासाठी टी-२० सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने ४७ विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह २१ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – IND vs WI 4th T20: सामन्यानंतर हार्दिक पांड्याने मान्य केली ‘ती’ चूक; म्हणाला, “पहिल्या सामन्यात…”

टी-२० क्रिकेटच्या पॉवरप्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

भुवनेश्वर कुमार – ४७ विकेट्स
जसप्रीत बुमराह – २१ विकेट्स
अर्शदीप सिंग – २० विकेट्स
रविचंद्रन अश्विन – १६ विकेट्स

१७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. जैस्वालने ५१ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकार मारून नाबाद ८४ धावा केल्या, तर गिलने ४७ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ७७ धावा केल्या. तिलक वर्माने ७ धावांचे योगदान दिले

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arshdeep singh became 3rd indian bowler to take the most wickets in the powerplay of t20 cricket vbm
Show comments