Arshdeep Singh’s grand welcome in Mohali video viral :आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत जेतेपद पटकावले. भारतीय संघाने १७ वर्षांनंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरले.अर्शदीप सिंग २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिला. त्याने ८ सामन्यात १७ विकेट घेत टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अंतिम सामन्यातही त्याने ४ षटकात केवळ २० धावा देत २ विकेट्स घेतल्या. यानंतर शनिवारी संध्याकाळी मोहालीत पोहोचताच त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीनंतर अर्शदीप सिंग शनिवारी संध्याकाळी शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्याचे फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आले. विमानतळावर तिथे त्याच्या स्वागतासाठी आधीच गर्दी जमली होती. विमानतळावर अर्शदीपचे पालक, त्याचे प्रशिक्षक, पंजाब सरकारचे काही अधिकारी आणि मोठ्या संख्येने चाहतेही उपस्थित होते. चाहत्यांनी अर्शदीपच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि ढोलाच्या तालावर नाचतानाही दिसले.

सर्वत्र चाहत्यांचा पाठिंबा अविश्वसनीय –

भारताच्या ऐतिहासिक विजयावर अर्शदीप सिंग म्हणाला, “एवढ्या उत्साहाने स्वागत करताना पाहून मला खूप आनंद होत आहे. दिल्ली असो, मुंबई असो किंवा चंदिगड, सर्वत्र चाहत्यांचा पाठिंबा अविश्वसनीय आहे. विश्वचषक जिंकणे हे स्वप्नासारखे आहे आणि आजूबाजूच्या लोकांचे प्रेम मिळणे हा एक उत्तम अनुभव आहे.”

हेही वाचा – IND vs ZIM 1st T20 : पदार्पणातच अभिषेक शर्माला चाहत्यांनी करुन दिली धोनीची आठवण, नेमकं काय आहे कारण?

मुंबईतील मरीन ड्राfव्हवर झालेल्या विजय परेडनंतर अर्शदीप सिंग मोहालीच्या फेज ११ येथील गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आला होता. तेथून खरार येथील त्यांच्या घराकडे रवाना झाला. अर्शदीप सिंगला खुल्या जीपमध्ये बसवून रॅलीही काढण्यात आली. यावेळी पंजाब किंग्जचे सीईओही उपस्थित होते. पंजाब किंग्जचे सीईओ सतीश मेनन यांनीही अर्शदीप सिंगचे कौतुक केले.

हेही वाचा – IND vs ZIM 1st T20 : निराशाजनक पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला? कोणाला धरले जबाबदार? जाणून घ्या

सतीश मेनन म्हणाले, “पंजाबचा एक खेळाडू टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी उंचावत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अर्शदीपचे कौशल्य आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. आता जगानेही त्याची प्रतिभा ओळखली याचा आम्हावा आनंद आहे. पंजाब किंग्ज फ्रँचायझीच्या सर्व सदस्यांना अर्शदीप सिंगच्या कामगिरीचा अभिमान आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arshdeep singh grand welcome in mohali after team india won the t20 world cup 2024 video viral vbm
Show comments