बुधवारी आयसीसीने पुरूषांच्या इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर २०२२ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर करण्यात आले आहे. या नामांकनाच्या यादीत एकाच भारतीय गोलंदाजाला स्थान मिळाले आहे. त्या गोलंदाजाचे नाव अर्शदीप सिंग आहे. त्याच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन, अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रान आणि न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॅलन यांनाही नामांकन मिळाले आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या पुरस्कारांसाठी मतदान जानेवारीपासून सुरू होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत अर्शदीपला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या वेगवान गोलंदाजाने २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १८,.१२च्या सरासरीने ३३ विकेट घेतल्या आहेत.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर, अर्शदीपने २०२१ टी-२० विश्वचषकातील निराशेनंतर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतासाठी देखील चांगली कामगिरी केली. अर्शदीपने नुकतेच भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातएकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
अर्शदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अल्पावधीत काही संस्मरणीय कामगिरी केली. ज्यामध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यातील प्रभावी कामगिरीचा समावेश आहे. त्याचा वेग आणि स्विंगमुळे अर्शदीपने पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर बाबर आणि रिझवान यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
तसेच डेथ ओव्हर्समध्ये या वेगवान गोलंदाजाने आसिफ अलीलाही बाद केले आणि सामन्यात ३२ धावांत तीन बळी घेतले. अर्शदीपला या पुरस्काराच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज जेन्सेन, न्यूझीलंडचा सलामीवीर अॅलन आणि अफगाणिस्तानचा फलंदाज झद्रान यांचे आव्हान आहे.