India vs Australia 5th T20: भारताने बंगळुरू येथे झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका ४-१ने जिंकली. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने अप्रतिम शेवटचे षटक टाकले आणि १० धावा वाचवून विजय मिळवला, असे असूनही अर्शदीप सिंग नाराज आहे. अर्शदीप म्हणाला की, “जर भारत हरला असेल तर तो स्वत:लाच दोष देणार होता,” असा खुलासा अर्शदीपने केला. यामागचे कारण त्याने सामन्यानंतर सांगितले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात १६० धावा केल्या. याचा बचाव करताना अर्शदीप सिंगने पहिल्या ३ षटकात ३७ धावा दिल्या. मात्र, शेवटच्या षटकात त्याने १० धावांचा चांगला बचाव केला. अर्शदीपने २०व्या षटकातील पहिले दोन चेंडूत एकही धाव दिली नाही, तसेच त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेड बाद देखील केले.”
हेही वाचा: Ashish Nehra: रिंकू सिंग टी-२० विश्वचषकसंघाचा भाग असेल का? आशिष नेहरा म्हणाला, “अजून तो…”
सामन्यानंतर प्रसारकांशी बोलताना अर्शदीप म्हणाला, “जवळपास पहिल्या १९ षटकांपर्यंत मी विचार करत होतो की, जर शेवटच्या षटकात जास्त धावा दिल्या तर मी स्वतः दोषी ठरेन.” एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या मैदानावर जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला दिलेले लक्ष्य लहान दिसू लागले तेव्हा, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. पण १७व्या षटकापर्यंत भारताने कांगारूंचे ७ विकेट्स १२९ धावांवर बाद केल्या होत्या.” अर्शदीप पुढे म्हणाला, “मात्र, देवाने मला आणखी एक संधी दिली आणि माझा स्वतःवर विश्वास होता. मी १० धावांचा बचाव केला याबद्दल देवाचे आभार आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सहकारी खेळाडूंचे देखील आभार.”
अर्धशतक झळकावल्यानंतर मॅकडरमॉट म्हणाला
ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज बेन मॅकडरमॉट भारतीय गोलंदाजांसाठी अडचणीचे कारण बनला होता. या सामन्यात भारताला सुरुवातीला यश मिळाले, पण बेन मॅकडरमॉटने ३६ चेंडूत ५ षटकार मारत ५४ धावा केल्या. मॅकडरमॉट म्हणाला की, “चिन्नास्वामीची खेळपट्टी सर्वसाधारणपणे कशी आहे, याची मला कल्पना नव्हती, परंतु मी ऐकले की हे एक हाय-स्कोअरिंग मैदान आहे.” मॅकडरमॉट पुढे म्हणाला, “मात्र दिवसभर पाऊस आणि हलक्या सरींमुळे येथे ओल कायम होती. आऊटफील्डही बऱ्यापैकी संथ होते, पण खेळपट्टीवर चेंडू देखील संथ येत होता. एवढे असूनही आम्ही चांगली झुंज दिली.”
हेही वाचा: IND vs AUS: “मला गोलंदाजी…”, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर श्रेयस अय्यरने केला मोठा खुलासा
अय्यरने शानदार खेळी केली
तत्पूर्वी, श्रेयस अय्यरने आपल्या टी-२० कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावून भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. अय्यरने संघाकडून सर्वाधिक ५३ धावा केल्या. त्याने ३७ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार मारले. अक्षर पटेलने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. जितेश शर्माने १६ चेंडूत २४ आणि यशस्वी जैस्वालने १५ चेंडूत २१ धावा केल्या. ऋतुराज गायकवाड १० धावा करून, रिंकू सिंग सहा धावा करून, सूर्यकुमार यादव पाच धावा करून आणि रवी बिश्नोई दोन धावा करून बाद झाले. दोन धावा केल्यानंतर अर्शदीप नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि बेन डोर्सिसने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅरॉन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघाला प्रत्येकी एक यश मिळाले.