यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत रविवारी (३ सप्टेंबर) झालेला भारत-पाकिस्तान सामना अनेक कारणांमुळे संस्मरणीय ठरला. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी भारतीय संघाने विजयासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आणि प्रशंसनीय होते. मात्र भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एक झेल सोडल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर तर अर्शदीप सिंगला थेट खलीस्तानी म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> IND vs Pak : अर्शदीप सिंगवर टीकेची झोड, पण विराट कोहलीने केली पाठराखण, म्हणाला “अशा सामन्यांत…”

भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात पाकिस्तानने भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला. या लढतीत सर्वच भारतीय खेळाडूंनी पूर्ण क्षमतेने सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केला. मात्र अर्शदीपने सोडलेल्या एका झेलमुळेच भारताचा पराभव झाला, असा दावा केला जातोय. तशा आशयाच्या काही पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. तसेच अर्शदीपने सोडलेल्या झेलचा मुद्दा घेऊन त्याला खलिस्तानी ठरवले जात आहे. तसेच खलिस्तानी म्हणत त्याला संघात स्थान देऊ नये, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा >>> IND vs PAK : ऋषभ अवघ्या १४ धावा करून परतला अन् कॅप्टन रोहित खवळला, लोकांनी पुन्हा घेतलं उर्वशी रौतेलाचं नाव

दरम्यान, भारताच्या पराभवामुळे अर्शदीपवर टीका केली जात असली तरी काही लोकांनी त्याची पाठराखण केली आहे. खेळामध्ये अशा बाबी घडत असतात. अर्शदीप एक सच्चा देशभक्त आहे. त्याच्यावर तसे आरोप करणे चुकीचे आहे, असे काहीजण म्हणत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेदखील अर्शदीपची पाठराखण केली आहे. जेव्हा आपण दबावामध्ये खेळत असतो तेव्हा अशा चुका होत असतात. अशा चुकांमधून धडा घेऊन पुन्हा एकदा तशा परिस्थितीस तोंड देण्यास आपण सज्ज असले पाहिजे, असे विराट कोहली म्हणाला आहे.

Story img Loader