Arshdeep Singh on Jasprit Bumrah, IND vs IRE: आयर्लंड दौऱ्यावरील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आपलाच कर्णधार जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहचला आहे. तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ५० विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. अर्शदीप सिंग बुमराहला मागे टाकून या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याच्या अगदी जवळ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेद्वारे जसप्रीत बुमराह ११ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली अर्शदीप सिंग स्वतःचा एक मोठा विक्रम रचण्याच्या जवळ आहे. अर्शदीप सिंगला पुढील ९ टी२० सामन्यांमध्ये हा विक्रम मोडण्यासाठी केवळ २ विकेट्स घ्यायच्या आहेत. अर्शदीप सिंगची गोलंदाजी पाहता तो बुमराहचा आयर्लंडविरुद्धचा विक्रम सहज मोडू शकतो.

अर्शदीप सिंग बुमराहचा कोणता विक्रम मोडेल?

जसप्रीत बुमराह सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वात वेगवान ५० विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने आपल्या ४१व्या टी२० सामन्यात ५० विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, अर्शदीप सिंगच्या नावावर ३१ सामन्यांमध्ये ४८ विकेट्स असून त्याला पुढील ९ सामन्यांमध्ये केवळ २ विकेट घ्यायच्या आहेत. अर्शदीप सिंगचा रेकॉर्ड खूप चांगला आहे, तो सुरुवातीला विकेट्स घेण्यात माहीर आहे. त्याने २ विकेट्स घेतल्यास तो बुमराहला मागे टाकून टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात वेगवान ५० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल.

हेही वाचा: Jasprit Bumrah: “माझं करिअर संपलं…”, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याआधी जसप्रीत बुमराहचे मोठे विधान

भारतासाठी टी२० मध्ये सर्वात वेगवान ५० विकेट्स घेणारा गोलंदाज

टीम इंडियासाठी सर्वात वेगवान ५० विकेट्स घेणारा गोलंदाज कुलदीप यादव आहे, ज्याने त्याच्या २९व्या टी२०मध्येच ५० विकेट्स घेतल्या. दुसऱ्या क्रमांकावर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आहे, त्याने ३४व्या टी२० सामन्यात ५० विकेट्स घेतल्या. बुमराह तिसऱ्या तर अर्शदीप सिंग चौथ्या क्रमांकावर आहे. अर्शदीप सिंग लवकरच बुमराहचा हा विक्रम मोडू शकतो, असे झाल्यास तो तिसऱ्या क्रमांकावर जाईल.

जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यापूर्वी सांगितले की, “जेव्हा तो एनसीए सराव करत होता, तेव्हापासूनच त्याने विश्वचषकाची योजना आखायला सुरूवात केली होती. मी १०, १२ किंवा १५ षटके टाकायचो, टी२० फॉरमॅटमध्ये पुनरागमनाची तयारी करत नव्हतो.” सर्वांच्या नजरा विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या घोषणेकडे लागल्या आहेत, ज्यामध्ये बुमराहचे पुनरागमन पाहिले जाऊ शकते. जसप्रीत बुमराहनेही आपल्या तंदुरुस्तीबद्दल वक्तव्य केले असून, पुनरागमन करताना मला खूप आनंद होत आहे. मी खूप मेहनत केली आणि माझे शरीर चांगली साथ देत आहे, या मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे.

हेही वाचा: Arjun Tendulkar: ‘ही दोस्ती तुटायची…’, जखमी पृथ्वी शॉला धीर देण्यासाठी आला बालपणीचा मित्र अर्जुन तेंडुलकर

आशिया कपमध्ये बुमराहची खरी फिटनेस चाचणी होईल

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारताला ५० षटकांच्या आशिया चषक स्पर्धेत बुमराहला भाग घ्यायचा आहे. यामध्ये सर्वांच्या नजरा नक्कीच जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर असणार आहेत. आशिया चषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा होणे बाकी आहे, परंतु भारतीय संघ या स्पर्धेत पूर्ण क्षमतेने खेळेल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arshdeep singh will shatter the big record of jasprit bumrah and yuzvendra chahal avw