प्रशांत केणी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सचिन रमेश तेंडुलकर म्हणजे क्रिकेटच्या नभांगणातील ध्रुवतारा. सचिनला घडविण्यात मोठा वाटा त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर आणि त्याचे लाडके प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांचा आहे, हे सर्वज्ञातच आहे. सचिन नावाच्या या प्रवासाला प्रारंभ झाला तो १९८४ साली. सचिनचा भाऊ अजित त्याला आचरेकर सरांकडे घेऊन गेला. त्या वेळी सचिन जेमतेम १२ वर्षांचा होता. सचिनकडे प्रथमदर्शनी पाहून, ‘‘हा खूप लहान आहे. वर्षभराने मी कदाचित त्याला माझ्या नेटमध्ये घेऊ शकेन,’’ असे मत आचरेकर सरांनी प्रदर्शित केले होते. पण अजितने हार मानली नाही. त्यांनी आचरेकरांना विनंती केली की, तुम्ही फक्त आठवडाभर त्याला फलंदाजी करताना पाहा, मग ठरवा. फक्त तुम्ही त्याचा खेळ पाहताय, हे त्याच्या लक्षात येता कामा नये, याची काळजी घ्या. अजितचे बोलणे आचरेकरांनी ऐकले आणि काही दिवसांतच सचिनची निसर्गदत्त गुणवत्ता हेरून आचरेकर सरांना अजितचे म्हणणे पटले. मग आठवडय़ाभरातच सचिन आचरेकरांच्या उन्हाळी क्रिकेट शिबिरात दाखल झाला. क्रिकेटच्या दुनियेतील या कोहिनूर हिऱ्यावर पैलू पाडण्याचे कार्य इथूनच सुरू झाले.
त्या वेळी सचिन वांद्रे येथील आयईएस शाळेत शिकायचा. परंतु दीड महिन्यांच्या क्रिकेट प्रशिक्षणानंतर आचरेकरांनी त्याची शाळा बदलायचा निर्णय घेतला. मग आचरेकर प्रशिक्षक असलेल्या दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत सचिन दाखल झाला आणि दादरच्या आपल्या नातेवाईकांकडे तो निवासाला आला. सचिनची क्रिकेट कारकीर्द शालेय स्तरावरच सर्वप्रथम अधोरेखित झाली. आचरेकर आणि अजित हे एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेत. सचिनच्या खेळाला आणि कारकीर्दीला दिशा देण्यासाठी ते तासन्तास चर्चा करत आणि मगच पुढे जात. आचरेकर सर स्वत:च्या स्कूटरवरून सचिनला शहराची रपेट करायला नेत. याचप्रमाणे सचिनची कामगिरी चांगली झाली की, ते त्याला वडापाव, भेळपुरी किंवा पाणीपुरी याची मेजवानीही देत. आचरेकरांमध्ये सच्चा गुरू दडला होता. एखाद्या मुलाची क्रिकेट प्रशिक्षणाचे शुल्क भरण्याची ऐपत नसेल, तर ते त्याला कधीच पैशाविषयी विचारणा करत नसत. ते त्या खेळाडूच्या आहाराचा खर्चही उचलत.
पाहता पाहता सचिनचा खेळ शालेय स्तरावर बहरू लागला होता. शालेय दिवसांत लांब केसांचा सचिन मस्तीखोर विद्यार्थी होता. १९८७ मध्ये १४ वर्षांचा असताना सचिनला मद्रास येथे एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये पाठवण्यात आले होते. परंतु ऑस्ट्रेलियाचे महान वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांच्यावर सचिनच्या गोलंदाजीची छाप पडली नाही. त्यांनी तू फलंदाजीकडेच लक्ष दे, असे सांगून सचिनची परतपाठवणी केली. त्यानंतर १९८८ मध्ये शालेय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावाचा दबदबा होता. त्याने हॅरिस ढाल आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेत आपला परममित्र विनोद कांबळीच्या साथीने नाबाद ६६४ धावांची ऐतिहासिक भागीदारी साकारली. या विक्रमाप्रसंगी सचिनने नाबाद ३२६ तर विनोदने नाबाद ३४९ धावा केल्या होत्या. याच दिवसांत सचिनला चक्क सुनील गावस्कर यांनी पॅडची जोडी भेट म्हणून दिली होती. तीच परिधान करून सचिनने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
सचिन त्या काळात नेट्समध्ये बराच वेळ सराव करायचा. सचिन जेव्हा थकायचा, तेव्हा आचरेकर सर यष्टीच्या माथ्यावर एक रुपयाचे नाणे ठेवायचे आणि जो गोलंदाज सचिनची यष्टी भेदेल, त्याला ते इनाम द्यायचे. परंतु सचिनने जर बाद न होता ते सराव सत्र खेळून काढले तर ते नाणे सचिन जिंकायचा. सचिनने आचरेकर सरांच्या या ‘भेट योजने’द्वारे तब्बल १३ नाणी कमवली होती. आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेवा मानून, सचिनने ती नाणी आजही जपून ठेवली आहेत.
सचिनबाबत आचरेकर सरांची आणखी एक आठवण सर्वानाच माहीत आहे. त्या वेळी आचरेकरांनी सचिनला शारदाश्रम शाळेच्या ‘ब’ संघातून खेळायला सांगितले होते. परंतु सचिनने या सामन्यात खेळण्याऐवजी गॅलरीत बसून संघसहकाऱ्यांना प्रोत्साहन देणे पसंत केले. सायंकाळी आचरेकर सरांनी सचिनची हजेरी घेतली आणि त्याला किती धावा काढल्यास, असा प्रश्न विचारला. सचिनने मी टाळ्या वाजवल्या आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याचे प्रामाणिकपणे सांगितले. मग क्षणार्धात आचरेकर सरांची पाच बोटे सचिनच्या गालांवर उमटली आणि हातात असलेला त्याचा जेवणाचा डबा मैदानावर पडला. सचिनला आपल्याकडून घडलेली चूक लक्षात आली. आचरेकर सरांनी त्या वेळी सचिनला गंभीरपणे सांगितले, ‘‘फक्त इतरांसाठी टाळ्या पिटू नकोस, स्वत:साठी खेळ आणि फलंदाजीकडे लक्ष केंद्रित कर.’’
बऱ्याचदा आचरेकर सर आपल्या खेळाडूंचे त्यांना लक्षातही येणार नाही, अशा रीतीने दुरून बारकाईने निरीक्षण करायचे. बऱ्याचदा सामना सुरू असताना ते खेळाडूंच्या कामगिरीचा व्यवस्थित अभ्यास करायचे आणि सामना संपल्यावर त्याचे ‘शल्य विच्छेदन’ व्हायचे. पूर्ण दिवस नजरेसही न पडलेल्या आपल्या सरांनी आपला खेळ पूर्णपणे पाहिला असल्याचे पाहून खेळाडूंना आश्चर्य वाटायचे. पण कालांतराने सरांचा फॉम्र्युला मुलांना वळणी पडला. त्यामुळे शिष्यांवर निरंतर प्रेम करणारे, हास्य-विनोद करणारे आचरेकर सर जसे खेळाडूंना आवडायचे तसाच त्यांचा दराराही असायचा. जेव्हा ते रागावायचे, तेव्हा ते कुणाचीही तमा बाळगायचे नाहीत. ‘‘खेळातील चुकांमुळे सरांनी अनेकदा माझे गाल लाल केले, परंतु त्याच क्षणांनी माझे आयुष्य बदलले. सरांची प्रत्येक कृती ही आपल्या भल्यासाठी असते, याची जाणीव आम्हाला होती,’’ असे सचिन अभिमानाने सांगतो.
दोन वर्षांपूर्वी सचिन वांद्रे पश्चिमेकडील पेरी क्रॉस रोड येथील नव्या बंगल्यात निवासाला गेला. त्यानंतर काही दिवसांनी आचरेकर सर त्याच्या घरी गेले होते. त्याप्रसंगी सचिनच्या आनंदाला पारावार नव्हता. जेव्हा लक्ष वेधणाऱ्या धावा करशील, तेव्हा मला घरी बोलव, असे सचिनला त्यांनी शालेय दिवसात ऐकवले होते. सचिन शाळेत असताना आचरेकर सर त्याच्या वांद्रे पूर्वेकडील साहित्य सहवासमधील निवासस्थानी गेले होते. सरांची पावले घराकडे लागणे, ही त्यांच्या प्रत्येक शिष्यासाठी दुर्मीळ अनुभूती होती. त्यामुळेच आचरेकर सर घरी आल्यानंतर सचिनने ‘हा माझ्या आयुष्यातील एक आनंददायी क्षण आहे,’ असे ‘ट्विटर’वर म्हटले होते. ३ डिसेंबर २०११ या दिवशी आचरेकरांच्या सर्व शिष्यांनी आपल्या गुरूचा वाढदिवस शानदार पद्धतीने साजरा केला होता.