कुमार विश्वचषकावर ७, ९, १० क्रमांकांच्या फुटबॉलपटूंचीच छाप
२४ संघ, २२ दिवस, ५२ सामने आणि १३ लाखाहूंन अधिक प्रेक्षकांची उपस्थिती ही कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची ढोबळ आकडेवारी. भारतात प्रथमच झालेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) या स्पर्धेने अनेक विक्रम मोडले. कुमार गटाची स्पर्धा म्हटले की त्यातून भविष्याच्या ताऱ्यांचा शोध ओघानेच आला. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज फुटबॉलपटू परिधान करणाऱ्या जर्सीवरील क्रमांकानुसार कुमार स्पर्धेतही त्याच क्रमांकाच्या खेळाडूंवर विशेष लक्ष आकर्षित असते. ७, ९, १० हे क्रमांक ही फुटबॉलविश्वात दिग्गज फुटबॉलपटूंची खरी ओळख मानली जायची. त्यामुळेच १० क्रमांक म्हटले की अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी, ७ क्रमांक आला की पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि ९ क्रमांक आला की ब्राझिलचा माजी खेळाडू रोनाल्डो हे खेळाडू डोळ्यांसमोर येतात. कुमार विश्वचषक स्पर्धेतही याच क्रमांकाची जर्सी परिधान करणाऱ्या खेळाडूंचा दबदबा जाणवला. त्यांच्यात भविष्यातील मेस्सी, रोनाल्डो, नेयमार, लुईस सुआरेझ, वेन रुनी यांचा शोधही सुरू झाला आहे. भारतात झालेल्या या स्पर्धेतून अशाच उदयोन्मुख खेळाडूंच्या कामगिरीवर आणि त्यांच्या जर्सी क्रमांकावर टाकलेला हा दृष्टीक्षेप..