दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल राष्ट्रांमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला असून चिलीने इक्वेडरला २-० असे नमवून विजयी सलामी नोंदवली आहे.
युवेंटसचा आघाडीचा खेळाडू आर्टुरो व्हिडालने ६७व्या मिनिटाला आणि नापोलीचा एडय़ुडरे व्हर्गासने सामना संपायला सहा मिनिटे बाकी असताना गोल नोंदवला. दुसऱ्या सत्रात झालेल्या दोन गोलच्या बळावर चिलीने ‘अ’ गटात आपले खाते उघडले.

Story img Loader