Women’s Premier League: डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्राचे आयोजन शानदारा पार पडले होते. या यशाने आनंदित झालेले आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रापासून होम आणि अवे फॉरमॅट लागू करण्याचा विचार करत आहोत. परंतु पुढील हंगामासाठी तीन वर्षे संघाची संख्या पाच राहील. डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम चाहत्यांना आणि खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय होता, परंतु ही स्पर्धा महिला टी-२० विश्वचषकानंतर लगेचच व्यस्त वेळापत्रकात आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे बीसीसीायने सर्व सामने दोन ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.
डब्ल्यूपीएलचे आयोजन हे आपल्या कार्यकाळातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगून धुमल म्हणाले की, होम आणि अवे स्वरूप संघाला चाहता वर्ग तयार करण्यात खूप मदत करेल. बोर्ड पुढील वर्षीच त्याची अंमलबजावणी करू इच्छित आहे. धुमल यांनी पीटीआयला सांगितले, “चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम पूर्ण झाले. डब्ल्यूपीएलने चांगली सुरुवात केली आहे आणि आम्ही आतापर्यंत जे पाहिले आहे, त्यापेक्षा भविष्य खूप चांगले असेल. आम्ही पाच संघांसह सुरुवात केली. परंतु खेळाडूंचा पूल लक्षात घेता भविष्यात अतिरिक्त संघांना वाव आहे.”
धुमल म्हणाले, “आम्हाला संघांची संख्या वाढवण्याची आशा आहे, परंतु पुढील तीन हंगामात केवळ पाच संघ असतील. आम्ही निश्चितपणे आमच्या होम आणि अवे सामन्यांचे स्वरूप पाहत आहोत, भारताच्या आंतरराष्ट्रीय बांधिलकी लक्षात घेता, कोणाकडे वेळ आहे ते आम्ही पाहू आणि नंतर निर्णय घेऊ. चाहत्यांच्या व्यस्ततेच्या दृष्टीकोनातून हे खूप महत्वाचे आहे की आम्ही स्वतः आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर सामन्याचे स्वरूप स्वीकारवे.”
हेही वाचा – IPL 2023: बीसीसीआयने जारी केले फर्मान, गोलंदाजांना गाळावा लागणार दुप्पट घाम, जाणून घ्या काय आहे कारण?
मोठ्या संख्येने चाहते उपस्थित –
ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियमवरील सामने पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बीसीसीआयला संघ हक्कांकडून ४७०० कोटी रुपये आणि मीडिया हक्कांकडून ९५१ कोटी रुपये मिळाले, त्यानंतर या स्पर्धेबद्दल चर्चा निर्माण होऊ लागली. धुमल म्हणाले, “डब्ल्यूपीएलसाठी उपलब्ध वेळ लक्षात घेता आतापर्यंतचा प्रवास अप्रतिम आणि खूपच आव्हानात्मक होता. गोष्टी ज्या प्रकारे प्रगती करत आहेत त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. आमच्याकडे जास्त वेळ नव्हता. कारण विश्वचषक देखील जवळ आला होता आणि मुलींना परत येण्यासाठी आणि सुरुवात करण्यासाठी फक्त एक आठवडा होता.”
आम्ही जगभरातील चाहत्यांशी कनेक्ट होणार आहोत –
धुमल म्हणाले, “प्रत्येकासाठी खेळात काहीतरी नाविन्य असायला हवे. खेळाशी संबंधित प्रत्येक गोष्ट चाहत्यांभोवती फिरली पाहिजे. चाहत्यांसाठी ते अधिक चांगले बनवण्याचा विचार आहे. आमच्या स्वतंत्र लिलावात (मीडिया अधिकारांचे), आमचे दोन उत्तम भागीदार आहेत. जागतिक प्रेक्षकांचा विचार करता आम्हाला बरीच बाजारपेठ काबीज करण्याची गरज आहे. आम्ही जगभरातील चाहत्यांशी संपर्क साधण्यास उत्सुक आहोत.”
हेही वाचा – IPL 2023: इरफान पठाण आणि सुनील गावसकरांनी नाटू-नाटू गाण्यावर धरला ठेका; पाहा मजेदार VIDEO
‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमावर धुमल काय म्हणाले –
धुमल म्हणाले की, आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम लागू झाल्याने नाणेफेकीचा फायदा कमी झाला आहे. कारण आता नाणेफेकीनंतर संघाची निवड करता येत आहे. ते म्हणाले, “आम्ही पाहिले आहे की दव एक मोठी भूमिका बजावते. नाणेफेक जिंकणे ही फायद्याची स्थिती म्हणून पाहिली जात होती. हे कमी करण्यासाठी, आम्ही ‘इम्पॅक्ट प्लेयर’ समावेश करण्याचा आणि नाणेफेक नंतर संघ निवडण्याची संधी देण्याचा विचार केला. जेणेकरून योग्य इलेव्हन निवडता येईल.”