Arundhati Reddy has been given 1 demerit point by ICC : महिला टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताची सुरुवात काही खास झालेली नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याच्या इच्छेने तिथे गेला आहे, पण त्यांची कामगिरी पाहता टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचेल की नाही हे सांगणे कठीण झाले आहे. दरम्यान, आयसीसीनेही एका खेळाडूला फटकारून भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे. टीम इंडियाची स्टार गोलंदाज अरुंधती रेड्डी हिला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीसीने फटकारले आहे.

अरुंधती रेड्डीवर आयसीसीची कारवाई –

अरुंधती रेड्डीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात असे काही केले होते की, ज्यामुळे आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागला? जाणून घेऊया. ६ ऑक्टोबर रोजी भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या अरुंधती रेड्डीने तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, आता अरुंधती रेड्डीवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Malegaon blast case Sadhvi Pragya Singh Absence despite bailable warrant
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी

काय आहे प्रकरण?

वास्तविक, पाकिस्तानच्या डावातील २०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तिने निदा दारला बाद केले होते. दार ३४ चेंडूंचा सामना करत २८ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर अरुंधतीने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले. तिने पाकिस्तानच्या पॅव्हेलियनकडे हातवारेही केले. हे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करते. या कारणास्तव आयसीसीने अरुंधतीला १ डिमेरिट पॉइंट दिला आहे. हा स्तर एकचा गुन्हा मानला जातो.

हेही वाचा – Sunil Gavaskar : ‘गौतम गंभीरचे तळवे चाटू नयेत…’, सुनील गावसकरांच्या विधानाने उडाली खळबळ, नेमकं प्रकरण काय?

अरुंधती रेड्डीने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यानंतर अपमानास्पद भाषा किंवा आक्रमक प्रतिक्रिया वापरली जाते, तेव्हा हे उल्लंघन मानले जाते. याशिवाय तिला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. अरुंधती रेड्डीने आपली चूक मान्य केली आहे. त्याचबरोबर एमिरेट्स आयसीसी आंतरराष्ट्रीय सामना पंचांच्या शांद्रे फ्रिट्झने दिलेली शिक्षा स्वीकारली. टीम इंडियाला आपला पुढचा सामना श्रीलंके संघाविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना ९ ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.