Bookies eyes on Ashes 2023 series: सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला आणि पुरुष संघांमध्ये ॲशेस मालिका सुरू आहे. बुधवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने दो गडी राखून सामना जिंकला. मात्र आता या मालिकेवर बुकींची नजर पडली आहे. वृत्तानुसार, ब्रिस्टलमधील पहिल्या सामन्यादरम्यान सट्टेबाजीच्या संशयावरून दोन व्यक्तींना स्टेडियमबाहेर हाकलण्यात आले होते.
चौथ्या ॲशेस कसोटीपूर्वी ईसीबी सावध –
त्याचबरोबर, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया पुरुष संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या ॲशेस कसोटीपूर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) सावध आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवून संशयितांची ओळख पटवली आहे. ईसीबीच्या निवेदनात म्हटले आहे, की दोन लोकांना मैदानाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले.
ही व्यक्ती अनेक मोबाईल फोन वापरत होती –
मिळालेल्या माहितीनुसार, सामना सुरू झाल्यानंतर तो अनेक मोबाईल फोन वापरताना दिसला, तेव्हा तो प्रथम तपासाच्या कक्षेत आला. त्यानंतर त्याने ‘पिच-साइडिंग’मध्ये गुंतल्याची कबुली दिली. पिच साईडिंगद्वारे, बुकीज स्टेडियमच्या आत थांबून बाहेरच्या सट्टेबाजांना झटपट सामन्याचे अपडेट देतात. यामुळे बुकींना थेट डेटा मिळतो. टीव्ही प्रसारणाला उशीर झाल्यामुळे सट्टेबाज या डेटाचा फायदा घेतात.
हेही वाचा – Duleep Trophy 2023: हनुमा विहारीने सोडले मौन; म्हणाला, “मला समजत नाही की टीम इंडियातून…”
सट्टेबाजीवर चिंता व्यक्त केली जात आहे –
दुसऱ्या व्यक्तीने सुरुवातीला असे काहीही नाकारले असले तरी. मात्र, नंतर त्याने कबुली दिली की, त्याच्याकडे असलेल्या फोन नंबरबाबत आपण खोटे बोललो होतो. अखेरीस, एव्हॉन आणि सॉमरसेट पोलिसांच्या मदतीने, त्याला देखील सीट युनिक स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले. एका वेगळ्या घटनेत, एका इंग्लिश खेळाडूने एका सामन्यापूर्वी सोशल मीडियावर संशयास्पद व्यक्तींशी संपर्क साधला होता, जिथे त्याला खेळपट्टीचा फोटो शेअर करण्यास सांगितले होते. ओल्ड ट्रॅफर्ड येथील चौथ्या ऍशेस कसोटीच्या आसपास सट्टेबाजीवर चिंता वाढली आहे. जप्त केलेल्या फोनपैकी एक मँचेस्टरसाठी एअरबीएनबी बुकिंगमध्ये सापडला आहे.
तिसर्या कसोटीदरम्यान झाली होती पिच साइडिंग –
हेडिंग्ले येथील तिसर्या कसोटीदरम्यान एका व्यक्तीला पिच-साइडिंगमध्ये सामील असल्याने बाहेर काढण्यात आले होते. यामुळे ईसीबीचे लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी भविष्यातील सामन्यांसाठी हाय अलर्टवर आहेत. डेली मेलमधील एका लेखात म्हटले आहे की पुरुष आणि महिला सामन्यांची अॅशेस मालिका, सट्टेबाजांचे लक्ष वेधून घेत आहेत.