बुधवारी रात्री उशारापर्यंत तो एस. श्रीशांत होता. अतिशय खिलाडू वृत्तीचा आणि थोडा भडक माथ्याचा, पुन्हा भारतीय संघासाठी खेळण्यास आशा बाळगून असलेला. मुंबईमध्ये मित्रांसोबत आरामात वेळ घालवत होता.
परंतू बरोबर २४ तासांनी तो झाला स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील एक आरोपी. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षामध्ये एकटाच एका खोलीमध्ये बसून तो अश्रू ढाळत होता. आता त्याची क्रिकेट कारकिर्द जवळपास संपुष्टात आली आहे.
विशेष तुरूंगातील अधिका-यांनी सांगीतले की, श्रीशांतने आपल्याजवळ रडत-रडत गुन्हा कबूल केला. तु असे का केलेस, असे अधिका-यांनी त्याला विचारले असता तो म्हणाला, “मी मोठी चूक केली आहे, आणि मला त्याचा खूप पश्चाताप होत आहे.”
श्रीशांत आणि राजस्थान ऱॉयलचे त्याचे सहकारी अजित चंडिला आणि अंकीत चव्हाण यांना दक्षिण दिल्लीच्या झामरूदपूरमधील एका घरी नेण्यात आले. गुरूवारी त्यांना साकेत न्यायालय संकुलात मुख्य महानगर दंडाधिका-यांसमोर हजर करण्यात आले. व त्यानंतर तिघांना विशेष कक्षात परत आणण्यात आले.
तीनही खेळाडूंना तुरूंगातील चपाती, भात, डाळ आणि भाजी असे नेहमीचे जेवण देण्यात आले. अजित आणि अंकीत यांनी जेवण केले. मात्र, श्रीशांतने जेवण करण्यास नकार दिला. एवढंच नव्हे तर तो पाणी देखील प्यायला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
“श्रीशांतला ज्यावेळी अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्या अंगावर असलेली निळी जीन्स आणि काळा टी शर्ट हे कपडे देखील रात्रभर बदलले नाहीत. तो जास्त न बोलता ऱात्रभर खुर्चीवरच बसून होता. मात्र, त्याचे दोन्ही सहकारी गाढ झोपले होते. ते एकमेकांशी जास्त बोलले नाही. “श्रीशांतला ऱात्रभर डासांनी त्रास दिला. तो रात्रभर झोपू शकला नाही आणि त्या धक्क्यातून देखील बाहेर निघाला नाही.’’, असं तुरूंगातील अधिका-यांनी सांगितले.
मात्र, शुक्रवारी सकाळी त्याने थोडा चहा घेतला, आणि त्याला चांगलीच भुक लागलेली दिसत होती. “आम्ही त्याला चहा बरोबर एक मठ्ठी खालला दिली. ती खाऊन त्याने आणखी एक मठ्ठी मागवून घेतली. त्यानंतर तो बोलण्यासाठी तयार झाला. एखादा अधिकारी त्यांच्या कक्षाजवळ गेल्यावर उभे राहून श्रीशांत म्हणे, “ काय सर, चौकशी करायची आहे काय?”
स्पॉट फिक्सिंग : अश्रू ढाळत श्रीशांतची कबूली
विशेष तुरूंगातील अधिका-यांनी सांगीतले की, श्रीशांतने आपल्याजवळ रडत-रडत गुन्हा कबूल केला. तु असे का केलेस, असे अधिका-यांनी त्याला विचारले असता तो म्हणाला, “मी मोठी चूक केली आहे, आणि मला त्याचा खूप पश्चाताप होत आहे.”
First published on: 18-05-2013 at 12:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As it all sinks in sreesanth breaks down in tears accepts mistake