Yashasvi Jaiswal Father, IND vs WI: यशस्‍वीचे वडील भूपेंद्र जैस्वाल मुलाच्‍या शतकानंतर कावड यात्रेला रवाना झाले आहेत. आपल्या मुलाने द्विशतक करावे, अशी विनंती ते देवाला करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यशस्वीचा जन्म उत्तर प्रदेशातील भदोही येथे झाला पण ती मुंबईकडून खेळते. मात्र, त्याचे आई-वडील भदोही येथेच राहतात. वडिलांच्या इच्छेनुसार द्विशतक नाही झालं पण पदार्पणातच सामनावीराचा बहुमान मिळाल्याने ते खूप खुश झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूपेंद्र जैस्वाल म्हणाले, “आम्ही खूप आनंदी आहोत. माझ्या मुलाने द्विशतक झळकावे असे मला वाटत होते पण पदार्पणातच सामनावीराचा पुरस्कार त्याला मिळाल्याने मी खूप समाधानी आहे. मी देवाला सांगेन की माझ्या मुलाने जरी द्विशतक झळकावले नाही तरी त्याच्या मेहनतीला आणखी यश मिळू दे.” यशस्वी जैस्वाल १७१ धावांवर बाद झाल्याने भूपेंद्रची इच्छा पूर्ण झाली नाही. जरी असे असले तरी त्याने अनेक विक्रम मोडले. त्याला अल्झारी जोसेफने यष्टिरक्षक जोशुआ डी सिल्वाच्या हाती झेलबाद केले. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने हा सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

हेही वाचा: IND vs WI: पहिल्या कसोटीत सामनावीर ठरल्यानंतर यशस्वीबाबत रोहित शर्माचे मोठे विधान; म्हणाला, “तो तयार आहे मात्र…”

यशस्वीच्या वडिलांनी नवस मागितला होता

क्रिकेट चाहत्यांच्या नजरा यशस्वी जैस्वाल याच्यावर खिळल्या होत्या. दरम्यान, त्याचे वडील भूपेंद्र जैस्वाल यांनी आपल्या मुलाचे द्विशतक पूर्ण व्हावे यासाठी इच्छा व्यक्त केली होती. या व्रतासाठी ते कावड यात्रेला गेले होते. यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी असल्याचे यशस्वीच्या वडिलांनी सांगितले. एवढेच नाही तर संपूर्ण भदोही जिल्हा आनंदात आहे.

यशस्वी जैस्वालचे द्विशतक थोडक्यात हुकले आणि तो त्याच्या वडिलांची इच्छा पूर्ण करू शकला नाही. परंतु या डावात त्याने अनेक विक्रम केले. यशस्वीने ३८७ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार आणि १ षटकार ठोकला. पदार्पणाच्या कसोटीत भारतासाठी मोठी खेळी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. शिखर धवन आणि रोहित शर्मा या बाबतीत त्यांच्या पुढे आहेत. २०१३ मध्ये मोहालीच्या मैदानावर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८७ धावा केल्या होत्या. रोहितने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १७७ धावांची खेळी केली होती.

हेही वाचा: IND vs WI: इशान किशन जेसन होल्डरला ‘बेअरस्टो स्टाइल’मध्ये बाद करणार होता पण…; सोशल मीडियामध्ये Video व्हायरल

या सामन्यात यशस्वीने रोहितसोबत पहिल्या विकेटसाठी २२९ आणि विराटसोबत तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. पहिल्याच कसोटीत दोन शतकांची भागीदारी करणारा तो पहिला फलंदाज आहे. परदेशी भूमीवर पदार्पण करताना सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत यशस्वीने सौरव गांगुलीला मागे टाकले. गांगुलीने १९९६ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध पदार्पणात १३१ धावा केल्या होत्या. जैस्वाल हा पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

Story img Loader