ऑस्ट्रेलियाचा संघ मंगळवारी तिसरी कसोटी जिंकून अ‍ॅशेस मालिकेवर ३-० असे वर्चस्व आखण्याचे मनसुबे बाळगून आहे. परंतु त्यांच्या विजयाच्या वाटेवर बेन स्टोक्स खंबीरपणे उभा आहे. सकाळच्या सत्रात गोलंदाजीचे कर्तृत्व दाखवणाऱ्या स्टोक्सने पहिलेवहिले नाबाद अर्धशतक झळकावून इंग्लिश संघाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडपुढे विजयासाठी ५०४ धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु चौथ्या दिवसअखेर इंग्लंडची दुसऱ्या डावात ५ बाद २५१ अशी दयनीय अवस्था झाली आहे. मंगळवारी इंग्लंडला विजयासाठी अजून २५२ धावांची आवश्यकता असून, त्यांचे पाच फलंदाज शिल्लक आहेत. आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणारा स्टोक्स ७२ धावांवर तर यष्टीरक्षक मॅट प्रायर ७ धावांवर खेळत आहे, तर इंग्लंडची आघाडीची फलंदाजीची फळी तंबूत परतली आहे. पर्थच्या खेळपट्टीवर भेगा पडल्या असून, त्या गोलंदाजांना साहाय्यक ठरत आहेत.
ब्रिस्बेन आणि अ‍ॅडलेड कसोटी सामने शानदार फरकाने जिंकणारा कांगारूंचा संघ मंगळवारी इंग्लंडचा निम्मा संघ गुंडाळून पर्थवरही आपला विजयाचा दबदबा राखू शकेल. त्यामुळे २००७नंतर प्रथमच अ‍ॅशेस ऑस्ट्रेलियाकडे जाऊ शकेल. इंग्लंडकडून केव्हिन पीटरसन (४५) आणि इयान बेल (६०) यांनी महत्त्वपूर्ण झुंज दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेलीकडून लाराच्या विक्रमाची बरोबरी
कसोटी क्रिकेटमधील एका षटकात सर्वाधिक धावांच्या ब्रायन लाराच्या विक्रमाची ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जॉर्ज बेलीने सोमवारी बरोबरी साधली. २००३मध्ये जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजच्या लाराने दक्षिण आफ्रिकेच्या रॉबिन पीटरसनच्या एका षटकात २८ धावा काढल्या होत्या. बेलीने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टिम ब्रेसननच्या षटकात तीन षटकार आणि दोन चौकारांची आतषबाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील हे अखेरचे षटक होते.