पाटा खेळपट्टीवर पहिल्या दिवशी फलंदाजी करताना मालिकेत आघाडीवर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ धावांचा डोंगर उभारेल अशी आशा होती, पण ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर राहता न आल्याने त्यांना ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. सलामीवीर ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन आणि जॉर्ज बेली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ५ बाद २७३ अशी मजल मारली आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांना पहिला धक्का ३४ धावांवर बसला, पण त्यानंतर रॉजर्स आणि वॉटसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. पण त्यानंतर रॉजर्स आणि वॉटसन संघाच्या १५५ धावा असताना बाद झाले व ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडला. रॉजर्सने ११ चौकारांच्या जोरावर ७२ धावांची, तर वॉटसनने ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५१ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर बेलीने ४ चौकार आणि ३ षटकार लगावत ५३ धावांची खेळी साकारत संघाला सावरले, पण सामना संपायला काही मिनिटे शिल्लकअसताना ब्रॉडच्या गोलंदाजीवर स्वानने अप्रतिम झेल पकडत त्याला तंबूत धाडले. बेली बाद झाल्यावर मायकेल क्लार्कचा (नाबाद ४८) सोपा झेल कॅरबेरीने सोडला आणि इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पीछाडीवर ढकलण्याची संधी गमावली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९१ षटकांत ५ बाद २७३ (ख्रिस रॉजर्स ७२, जॉर्ज बेली ५३; स्टुअर्ट ब्रॉड २/६३)
अॅशेस कसोटी क्रिकेट मालिका : ऑस्ट्रेलिया सुस्थितीत
पाटा खेळपट्टीवर पहिल्या दिवशी फलंदाजी करताना मालिकेत आघाडीवर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ धावांचा डोंगर उभारेल अशी आशा होती,
First published on: 06-12-2013 at 02:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashes 2013 england rue dropped chances as australia take charge