मार्क वूडने नॅथन लिऑनला त्रिफळाचीत केले आणि एकच विजयाचा जल्लोष झाला. इंग्लंडच्या खेळाडूंनी एकत्रितपणे येऊन आनंद साजरा केला, स्टेडियमध्येही चाहत्यांनी जयघोष सुरू ठेवला. विमानांनीही रंग उधळत कुर्निसात केला. आणि इंग्लंडचा संघ संपला, या टीकेला कर्णधार अॅलिस्टर कुकने कामगिरीतून उत्तर दिले. अॅशेस मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेत इंग्लंडने चषक आपल्याकडेच कायम ठेवण्याची किमया साधली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २५३ धावांवर आटोपत इंग्लंडने चौथा सामना एक डाव आणि ७८ धावांनी जिंकला. गेल्या सात मालिकांमधला इंग्लंडचा हा पाचवा अॅशेस विजय असून मायदेशात यापैकी चार विजय त्यांनी नोंदवले आहेत.
फक्त १०.२ षटकांत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाद करत इंग्लंडने विजयावर शिक्कामोर्तब केले. या तीनपैकी दोन बळी वूडने मिळवले. मिचेल स्टार्कला (०) बाद करत बेन स्टोक्सने या डावातील सहावा बळी मिळवत संघाला पहिले यश मिळवून दिले. सामन्यात नऊ बळी मिळवत इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या स्टुअर्ट ब्रॉडला यावेळी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ६०.
इंग्लंड (पहिला डाव) : ३९१.
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ७२.४ षटकांत सर्व बाद २५३ (डेव्हिड वॉर्नर ६४; बेन स्टोक्स ६/३६).
सामनावीर : स्टुअर्ट ब्रॉड.
अॅशेसवर शिक्कामोर्तब
मार्क वूडने नॅथन लिऑनला त्रिफळाचीत केले आणि एकच विजयाचा जल्लोष झाला. इंग्लंडच्या खेळाडूंनी एकत्रितपणे येऊन आनंद साजरा केला,
First published on: 09-08-2015 at 03:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashes 2015 england retake ashes after mauling australia by an innings and 78 runs