अ‍ॅडलेडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅशेसच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दबदबा पाहायला मिळत आहे. सामन्याचा शेवटचा दिवस बाकी असून इंग्लंडसमोर ३८६ धावांचे कठीण लक्ष्य आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी असे काही घडले, की लोकांमध्ये हशा पिकले. इंग्लंडचा कर्णधार जो रुट फलंदाजी करत असताना, त्याच्या प्रायव्हेट पार्टला चेंडू लागला. यानंतर त्याला फलंदाजीत खूप अडचणी आल्या.

दुसऱ्या डावात जो रूट फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला होता. दरम्यान, दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी जो रूट फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा चेंडू त्याच्या प्रायव्हेट पार्टला लागला. त्यानंतर तो वेदनेने ओरडू लागला आणि जमिनीवर झोपला.

थोड्या विश्रांतीनंतर जो रूट पुन्हा उभा राहू शकला. यादरम्यान आणखी एक मजेदार गोष्ट घडली, तो आपला गार्ड अ‍ॅडजस्ट करत असताना स्पायडरकॅम त्याच्याजवळ आला. त्याचवेळी जो रूटने कॅमेरा दूर करण्यास सांगितले आणि नंतर गार्ड अ‍ॅडजस्ट केला.

चेंडू प्रायव्हेट पार्टला आदळल्यानंतर जो रूट जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. त्याला सतत वेदना होत होत्या आणि नीट धावताही येत नव्हते. रुट धाव घेण्यासाठी धावला, तेव्हा त्याला खूप त्रास झाला आणि तो वाकड्या पद्धतीने धावू लागला. हे पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या रिकी पाँटिंगलाही हसू आवरता आले नाही.

हेही वाचा – काय सागंताय काय..! विराटबाबत झाला ‘धक्कादायक’ खुलासा; BCCIनं त्याच्या हकालपट्टीचा निर्णय…

या सामन्यातही इंग्लंड पराभवाच्या छायेत आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या ४ बाद ८२ अशी आहे. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ६ गड्यांची आवश्यकता आहे. तर इंग्लंडला ३८६ धावांचे खडतर आव्हान पार करावे लागेल.

Story img Loader