ENG vs AUS, Ashes 2023: अॅशेस मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जात आहे. या मालिकेत कांगारूंनी २-१ अशी आघाडी घेतली आहे, तर एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. दुसरीकडे, इंग्लंडला जर मालिका वाचवायची असेल, तर शेवटच्या सामन्यातील विजय खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान, पाचव्या कसोटीत एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. इंग्लंडच्या खेळाडूंनी एकमेकांची जर्सी घातली.
माहितीसाठी की, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने एक विचित्र कृत्य केले आहे. वास्तविक, इंग्लिश क्रिकेटर्स मॅचपूर्वी एकमेकांची जर्सी परिधान करत होते, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टुअर्ट ब्रॉडने जेम्स अँडरसनची जर्सी घातली आहे आणि जॉनी बेअरस्टोने कॅप्टन बेन स्टोक्सचा टी शर्ट घातला आहे. या त्यांच्या अशा वागण्यामागे एक कारण आहे.
एकमेकांची जर्सी बदलण्यामागे नेमकं काय कारण आहे?
विशेष म्हणजे, डिमेंशिया असलेल्या लोकांना अनेकदा त्यांना स्मृती भ्रंश होतो. खूप गोष्टी तो आजार असलेले व्यक्ती विसरतात. या त्यांच्या आजाराकडे सर्वांचे लक्ष जावे याकरिता इंग्लंडचे क्रिकेटपटू सामन्यापूर्वी एकमेकांच्या जर्सी परिधान करत आहेत. वास्तविक, या आजाराने त्रस्त लोकांसाठी इंग्लंडच्या संघाने असे कृत्य केले आहे. इंग्लंड संघाचे हे पाऊल क्रिकेट विश्वासाठी अभिमानास्पद मानले जात आहे. त्यांच्या या कृत्याने अशा लोकांकडे समजाचा बघण्याचा एक दृष्टीकोन तयार होईल.
डिमेंशिया म्हणजे काय?
माहितीसाठी की, डिमेंशियामुळे मेंदूची क्षमता सतत कमी होत जाते. या आजारामुळे लोक त्यांच्या आठवणी विसरतात, त्यामुळे त्यांना भूतकाळातील गोष्टी आठवत नाहीत. या आजारात मेंदूच्या संरचनेत शारीरिक आणि मानसिक बदल होतात. याच कारणामुळे इंग्लंड संघाने पाचव्या कसोटीत अशा पिडीतांसाठी हे पाऊल उचलले. जेणेकरुन अशा व्यक्तींकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊ शकू.
सामन्यात काय झाले?
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना लंडनच्या किंग्स्टन ओव्हलवर खेळला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात २८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २९५ धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाला १२ धावांची आघाडी मिळाली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसऱ्या डावाचा खेळ सुरूच आहे.
इंग्लंडने दुसऱ्या डावात एक विकेट गमावून ११० हून अधिक धावा केल्या आहेत. जॅक क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील १०वे अर्धशतक झळकावले. सध्या तो ५७ धावांवर तर कर्णधार बेन स्टोक्स ९ धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये ३०+ धावांची भागीदारी झाली आहे. बेन डकेटच्या रूपाने इंग्लंडला पहिला धक्का बसला. तो ५५ चेंडूत ४२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. डकेटला स्टार्कने यष्टिरक्षक कॅरीच्या हाती झेलबाद केले. इंग्लंडची आघाडी १०० धावांपेक्षा जास्त आहे.