ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ब्रेट लीने १६ जूनपासून एजबॅस्टन येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या अ‍ॅशेस कसोटीत स्कॉट बोलंडच्या समावेशाचे समर्थन केले आहे. दुखापतीमुळे जोश हेझलवूड अनुपलब्ध असलेल्या मायकेल नेसरऐवजी स्कॉट बोलंडची WTC फायनल प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली. मात्र, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉर्नने यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजयासाठी पायाभरणी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना एका षटकात बाद करत टीम इंडियाला दुहेरी झटका दिला. पाचव्या दिवशी भारताला २३४ धावांत गुंडाळण्यात बोलंडने महत्त्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियन बॅटिंगने शानदार फलंदाजी करत संघाला सुदृढ स्थितीत नेले होते. त्यावर बोलंडने कळस चढवला असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

जोश हेझलवूड आता तंदुरुस्त आणि निवडीसाठी उपलब्ध असलेल्या पहिल्या अ‍ॅशेस कसोटीसाठी जेव्हा ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी आक्रमणाची निवड केली तेव्हा ही ऑस्ट्रेलियासाठी निवड डोकेदुखी ठरेल. ब्रेट ली ने नाइन टुडेला सांगितले, “ अंतिम संघात कोणाला घ्यावे हे एक कोडे आहे, नाही का? मी हेझलवूडचा मोठा चाहता आहे आणि मिशेल स्टार्कचाही. संघाने इतके चांगले केले आहे कोणाला बाहेर ठेवावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी कोणाला तरी एका व्यक्तीला बाहेर काढावे लागेल. जे कोणत्याही गोलंदाजासाठी वाईट गोष्ट आहे. माझा अंदाज आहे की संघ स्कॉट बोलंडला बाहेर ठेवेल. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही स्कॉट बोलंडकडे दुर्लक्ष करू शकत नाही.”

हेही वाचा: Babar Azam: Virat Vs Babar: “बाबर आझम विराट कोहलीला मागे टाकणार”, इम्रान खानने का केला हा दावा? जाणून घ्या

इंग्लंड स्पिनर म्हणून स्कॉट बोलंडला खेळेल – मायकेल वॉन

बोलंडने आपल्या कामगिरीने इंग्लंडसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे पण मायकेल वॉन म्हणतो की संघ त्याच्याविरुद्ध आक्रमक स्वरूपाचा खेळ करूनच खेळेल. फॉक्स क्रिकेटवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, “बेसबॉलचा दृष्टिकोन बहुतेक संघांविरुद्ध यशस्वी झाला आहे. हा ऑस्ट्रेलियन संघ जरा वेगळा असला तरी त्यांची गोलंदाजी खूप चांगली आहे. इंग्लंडला त्याच दृष्टिकोनाने खेळायला आवडेल. जरी स्कॉट बोलंडची उंची खूप जास्त असली तरी इंग्लिश संघ त्याला फिरकीपटू म्हणून खेळवणार आहे.” असे म्हणत वॉनने त्याची खिल्ली उडवली. वेगवान गोलंदाजाला एका फिरकीपटूसारखे हिणवणे एकप्रकारे त्याची चेष्टा करण्यासारखेच असते.  

माहितीसाठी! गेल्‍या अ‍ॅशेस मालिका ऑस्ट्रेलियामध्‍ये खेळली गेली होती, जेथे इंग्‍लंडला ४-० ने पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यावेळी इंग्लंडचा संघ नवा प्रशिक्षक आणि नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळत आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या बेसबॉल पद्धतीची बरीच चर्चा होत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या भक्कम आक्रमणासमोर इंग्लंडचा संघ हा दृष्टिकोन ठेवून खेळू शकतो का, हे पाहावे लागेल.

हेही वाचा: Babar Azam Record: बाबर आझमचा कसोटी क्रिकेटमध्ये नवीन विक्रम! विराट-स्मिथसहित सचिनलाही टाकले मागे, जाणून घ्या

ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस जिंकणार ‘ब्रेट ली’ला वाटतो विश्वास

ब्रेट लीचा विश्वास आहे की, “ऑस्ट्रेलिया आगामी अ‍ॅशेस मालिकेत विजय मिळवू शकेल परंतु पहिला सामना महत्त्वपूर्ण असेल असे म्हणत योजनेवर भर दिला.” तो म्हणाला की, “एजबॅस्टन माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. पोम्सवरही (पॅट कमिन्स) खूप दडपण आहे, कारण जेव्हा तुम्ही या संपूर्ण बेसबॉलबद्दल विचार करता तेव्हा निश्चिततच थोडा विचार करावा लागतो. जर त्यांनी पहिली कसोटी गमावली तर इंग्लिश पत्रकारांना सामोरे जाणे इंग्लंडसाठी खूप कठीण जाईल. ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करावी लागेल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashes 2023 england will play scott boland like a spinner michael vaughan said before the ashes avw