ENG vs AUS, Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटीच्या ५व्या दिवशी हा थरार वेगळ्याच पातळीवर पाहायला मिळाला. जॉनी बेअरस्टोच्या धावबादनंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या इंग्लंड संघाच्या चाहत्यांचा राग ऑस्ट्रेलियन संघावर स्पष्ट दिसत होता. उपहाराच्यावेळी खेळ थांबवण्यात आला तेव्हा लॉर्ड्स स्टेडियमच्या लॉंग रूममधून बाहेर पडताना एमसीसी सदस्य ऑस्ट्रेलियन खेळाडू उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याशी वाद घालताना दिसले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या घटनेनंतर एमसीसीला खूप मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता तीन सदस्यांवर कारवाई करत त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे. एमसीसीने आपल्या वतीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “ऑस्ट्रेलियन खेळाडूंना शिवीगाळ आणि मारहाण करण्याच्या घटनेची चौकशी केली जाईल. एमसीसीने तीन सदस्यांनाही निलंबित केले आहे. जोपर्यंत या संपूर्ण घटनेचा निकाल येत नाही तोपर्यंत त्यांचे निलंबन मागे घेतले जाणार नाही किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई देखील केली जाणार नाही.”
उस्मान ख्वाजाने या घटनेबद्दल निराशा व्यक्त करत टीका केली
ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा या घटनेवर ‘चॅनल ९’शी बोलताना म्हणाला की, “ही घटना खरोखर निराशाजनक आणि निंदनीय आहे. लॉर्ड्स हे माझ्या आवडत्या मैदानांपैकी एक आहे. लॉर्ड्सवर तुमचा नेहमीच आदर केला जातो. विशेषतः जेव्हा तुम्ही लॉंग रूमच्या बसलेल्या सदस्यांमधून जात असता. जर कोणी तुम्हाला विचारले की खेळण्यासाठी सर्वोत्तम जागा कुठे आहे, मी नेहमी लॉर्ड्सचे नाव घेईन, परंतु एमसीसीच्या सदस्यांनी जे सांगितले ते खूपच निराशाजनक होते. त्यांनी केलेल्या कृत्याचा मी निषेध करतो.”
ख्वाजा पुढे म्हणाले की, हे दृश्य अत्यंत निराशाजनक होते. मी गप्प बसून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार नाही. म्हणूनच मी त्यांच्यापैकी मोजक्याच लोकांशी बोललो कारण ते मोठे आरोप करत होते आणि त्यांना उत्तर देणे आवश्यक होते. तो बोलत राहिला आणि मी म्हणालो ठीक आहे तुमची इथे मेंबरशिप आहे. खरे सांगायचे तर हा खूप वाईट अनुभव होता कारण तुम्हाला सदस्यांकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा आहे.
पॅट कमिन्सने केला या घटनेचा निषेध
“निर्णय अंपायरच्या हातात होता. आज जर अंपायरने तो डेड बॉल मानला असता, तर तो डेड बॉल होता. कालच्या झेलप्रमाणे मिचेल स्टार्कचा झेल नॉट आऊट होता पण त्याला बाद देण्यात आले. आम्ही त्याच्याशी पूर्णपणे सहमत नाही. , पण तुम्हाला अंपायर्सचा निर्णय मान्य करावा लागेल.” असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे त्याला लॉग रूमबाबतील घटनेवर विचारण्यात आले त्यावर तो म्हणाला की, “ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू आणि कर्मचार्यांना शाब्दिक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे, काही जणांशी धक्काबुक्की देखील झाली का? कारण, ते सदस्यांच्या परिसरातून जेवणासाठी जात होते. याची चौकशी व्हावी.” कमिन्सने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.