AUS vs ENG, Moeen Ali Fined: इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला आयसीसीने आचारसंहिता मोडल्याबद्दल दंड ठोठावला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मोईन अली अडचणीत सापडला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या मोईन अलीला आयसीसीने त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावला आहे.

मोईन अलीला वाढदिवसाच्या दिवशीच आयसीसीने आचारसंहिता मोडल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. मोईन अलीवर आयसीसीची आचारसंहिता २.२० मोडल्याचा आरोप आहे. वास्तविक, हे खेळाच्या भावनेविरुद्ध खेळाडूंच्या वर्तनाला लागू होते. आयसीसी आचारसंहिता लेव्हल-१ अंतर्गत दोषी आढळल्यानंतर मोईन अलीच्या नावावर १ डिमेरिट गुण जोडण्यात आले आहेत. मात्र, गेल्या २४ महिन्यांत मोईन अली पहिल्यांदाच दोषी आढळला आहे.

court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू

हेही वाचा: Jasprit Bumrah: अखेर प्रतीक्षा संपणार? वर्ल्डकप २०२३पूर्वी जसप्रीत बुमराह लवकरच ‘या’ मालिकेतून करणार पुनरागमन

मोईन अलीला दंड का ठोठावला?

ही घटना एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत असताना ८९ वे षटक सुरू होते. त्यावेळी मोईन अली सीमारेषेवर उभा होता, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू चेंडूला कोणतीतरी कोरडी गोष्ट लावताना दिसला. ज्यानंतर आयसीसीने मोईन अलीला आयसीसीच्या आचारसंहिता २.२०चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. मात्र, मोईन अलीने आयसीसीची शिक्षा मान्य केली आहे, त्यामुळे आता औपचारिक सुनावणी होणार नाही.

मोईन अलीच्या वाढदिवशी ICCने दिली मोठी शिक्षा, लाखोंचे नुकसान

खरं तर, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंडचा खेळाडू मोईन अलीला मोठा झटका बसला. आज म्हणजेच १८ जून रोजी मोईन अली आपला वाढदिवस साजरा करत आहे, मात्र या खास प्रसंगी आयसीसीने त्याला कठोर शिक्षा केली आहे. ही घटना एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत असताना ८९ वे षटक सुरू होते. त्यावेळी मोईन अली सीमारेषेवर उभा होता, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू चेंडूला कोणतीतरी कोरडी गोष्ट लावताना दिसला. ज्यानंतर आयसीसीने मोईन अलीला आयसीसीच्या आचारसंहिता २.२०चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. मात्र, मोईन अलीने आयसीसीची शिक्षा मान्य केली आहे, त्यामुळे आता औपचारिक सुनावणी होणार नाही.

हेही वाचा: R. Ashwin: WTC फायनलनंतर अश्विनने टीम इंडियाचे दुःखद वास्तव केले उघड, म्हणाला, “संघातील खेळाडू आधी मित्र होते आता केवळ…”

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३८६ डावांवर आटोपला

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३८६ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडला सात धावांची आघाडी मिळाली. त्याने पहिल्या डावात आठ गडी बाद ३९३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १४१ धावा केल्या. अ‍ॅलेक्स कॅरीने ६६ आणि ट्रॅव्हिस हेडने ५० धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्स आणि कॅमेरून ग्रीन  प्रत्येकी ३८-३८ धावा करून बाद झाले. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.