Ricky Ponting on Ben Stokes: अ‍ॅशेस मालिका२०२३ मध्ये सध्या कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रंगतदार लढत सुरू आहे. रविवारी तिसर्‍या दिवशीचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात दोन विकेट्स पडल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्थितीत असेल, पण इंग्लंड पलटवार करण्यास सक्षम आहे. प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, ज्यावेळी दडपणाखाली विस्कळीत व्हायचा. गेल्या काही वर्षांत इंग्लंडने ‘बॅझबॉल’ क्रिकेटच्या स्वरूपात खेळात आक्रमकता आणून ‘काउंटर अटॅक’ करून विरोधी संघाला चकित केले आहे. यावरच ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने रिकी पाँटिंगने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

एक काळ असा होता की ‘बॅझबॉल’ ही इंग्लंडने तयार केलेलं नाटक आहे असे मानली जात होते, परंतु बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या तीन दिवसांत इंग्लिश संघ ज्या प्रकारे खेळला आणि विजयाच्या जवळ आला त्यामुळे रिकी पाँटिंग खूप प्रभावित झाला आहे. आयसीसी रिव्ह्यूच्या ताज्या भागामध्ये, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंग संजना गणेशनच्या मुलाखती दरम्यान म्हणाला, “बझबॉल ही पद्धत क्रिकेटमध्ये चालेल का? या शैलीत ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळण्यासाठी बेन स्टोक्स असे धाडस करू शकेल का? मला वाटते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली आहेत. त्याने (बेन स्टोक्स) त्याला ज्या पद्धतीने खेळायचे आहे ते दाखवून दिले.” पाँटिंगने दोन उदाहरणांद्वारे आपला मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

अ‍ॅशेसच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारण्याचा असा दृष्टिकोन

ऑस्ट्रेलियाला दोन विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार पाँटिंग म्हणाला, “मला विश्वास आहे की (सलामीवीर) झॅक क्रॉलीने कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर हे दाखवण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला कव्हर्सच्या दिशेने चौकार मारणे हा असा दृष्टिकोन ठेवणे सोपे काम नाही. आधी असे कसोटी सामने पाहिले नव्हते पण क्रिकेट खूप बदलत असून इंग्लंडचा संघ नेहमीच त्यात पुढे असतो.”

हेही वाचा: ENG vs AUS: मार्नस लाबुशेनने पकडलेला झेल वादाच्या भोवऱ्यात, चाहते म्हणतात, “ऑस्ट्रेलिया रडीचा डाव…”, पाहा video

पुढे रिकी म्हणाला की, “आपण असे नेहमीच पाहत नाही, आगामी काळात आणि सध्याच्या इंग्लंड संघाचा दृष्टिकोन बदलण्याचे हे मोठे लक्षण आहे. तसेच, कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा उस्मान ख्वाजा शतक झळकावून दमदार खेळी करत होता तेव्हा स्टोक्सने मैदानावर अंब्रेला म्हणजेच छत्रीच्या आकाराची फिल्डिंग लावून ख्वाजाभोवती जाळे निर्माण केले आणि त्यात तो अडकला. इंग्लंडच्या गोलंदाजी रणनीतीमध्ये वेगळीच विचारसरणी स्टोक्सने दाखवली. त्याच्या या नवीन दृष्टिकोनामुळे वेगळा विचार करायला लागलो. ख्वाजाभोवती सहा क्षेत्ररक्षक उभे करून त्याने दबाव निर्माण करण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला.”

हेही वाचा: IND vs PAK: अखेर पाकिस्तानी संघाला मिळाला व्हिसा, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक महामुकाबला

रिकी पाँटिंग स्टोक्सच्या कॅप्टन्सीने झाला प्रभावित

आयसीसीशी बोलताना पाँटिंग म्हणाला की, “तो प्रत्येक चेंडूनंतर वेगळा विचार करत असतो, जे खूप छान आहे. ही सक्रिय कर्णधाराची लक्षणं आहेत. खेळाला पुढे नेण्यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील असतो. विकेट्स काढण्यासाठी आणि खेळाचा वेग बदलण्यासाठी तो छोट्या छोट्या मार्गांचा शोध घेत असतो, हे खेळात असण्याचे लक्षण आहे. सध्याच्या इंग्लंड संघाच्या दृष्टिकोनातही बदल झाल्याची चिन्हे आहेत.”तो पुढे म्हणाला की, “बझबॉलमध्ये क्षमता आहे की नाही यावर बरीच चर्चा झाली. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध तो अशी रणनीती तयार करेल का? आता मला वाटते की या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.”