ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा सामना अ‍ॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ९ बाद ४७३ धावांवर घोषित केला. यजमानांकडून मार्नस लाबुशेनने शतक ठोकत १०३ धावा केल्या. यासह गुलाबी चेंडू कसोटीत तीन शतके झळकावणारा लाबुशेन पहिला फलंदाज ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला मार्कस हॅरिसच्या (३) रुपात लवकर मोठा धक्का बसला. येथून डेव्हिड वॉर्नरने मार्नस लाबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी करून संघाला आधार दिला. वॉर्नर सलग दुसऱ्या डावात नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला. वॉर्नरने ११ चौकारांच्या मदतीने ९५ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लाबुशेनने कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत अर्धशतकी भागीदारी केली.

स्टीव्ह स्मिथने ट्रॅव्हिस हेडसह चौथ्या विकेटसाठी ५० धावा केल्या. तब्बल ३ वर्षांनी ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषवत स्मिथने ९३ धावा केल्या. त्याच्याशिवाय अॅलेक्स कॅरीने ५२, तर मिचेल स्टार्कने ३९ धावा केल्या. २९४ धावांवर ५ विकेट गमावल्यानंतर स्मिथने अॅलेक्स कॅरीसह ९१ धावा जोडल्या. यानंतर पदार्पण करणाऱ्या मायकेल नेसरने मिचेल स्टार्कसह आठव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. नेसरने पहिल्या कसोटी डावात ३५ धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ३, तर जेम्स अँडरसनने २ बळी घेतले.

हेही वाचा – VIDEO : मानलं भावा..! थोडक्यात शतक हुकलं, तरीही जिंकली मनं; पॅव्हेलियनमध्ये जाता जाता वॉर्नरनं चिमुरड्याला केलं खूश!

लाबुशेनचे पराक्रम

लाबुशेनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आता इंग्लंडचा कर्णधार जो रूटसोबत संयुक्तपणे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक कसोटी शतके ठोकणारा फलंदाज

ठरला. लाबुशेनने ३०५ चेंडूंत ८ चौकार ठोकले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये लाबुशेनची आता एकूण सहा शतके आहेत आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटनेही तेवढीच शतके झळकावली आहेत. श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्ने आणि भारताचा रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही खेळाडूंनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५-५ शतके झळकावली आहेत.

लाबुशेनने या कालावधीत कसोटीत २००० धावा पूर्ण केल्या. त्याने अवघ्या ३४ डावात ही कामगिरी केली. डॉन ब्रॅडमन (२२), जॉर्ज हेडली (३२), हर्बर्ट सटक्लिफ (३३) आणि माइक हसी (३३) यांनी यापेक्षा कमी डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
या कसोटीत लाबुशेनने सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडला आहे. लाबुशेन त्याची २०वी कसोटी खेळत आहे. या सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने १७व्यांदा ५० हून अधिक धावा केल्या. यासह त्याने ब्रॅडमन यांनाही मागे टाकले. वास्तविक, ब्रॅडमन यांनी २० कसोटीत १५ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.