अत्यंत रंगतदार झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने आपल्या शेवटच्या विकेटचा बचाव करत ऑस्ट्रेलियाचे विजयी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. सिडनीत पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाने ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा इंग्लंडच्या झॅक क्रॉवली आणि हसीब हमीद या सलामीवीरांनी बिनबाद २९ अशी मजल मारली. पण पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंड, पॅट कमिन्स यांनी चांगला मारा करत इंग्लंडची वाईट अवस्था केली. शेवटच्या दोन षटकात इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड झुंज देत होते. या दोघांनी ही दोन्ही षटके खेळून काढत सामना ड्रॉ केला.

बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी दोन्ही डावात शानदार फलंदाजी करत इंग्लंड संघाला सिडनीमध्ये सन्मान राखण्यास मदत केली. दुसऱ्या डावात स्टोक्सने ६० आणि बेअरस्टोने ४१ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी पाचव्या दिवशी ३८८ धावांची गरज होती, पण संघ ९ विकेट गमावून केवळ २७० धावा करू शकला. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रावलीने सर्वाधिक ७७ धावा केल्या. सिडनी कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ ३-० ने आघाडीवर आहे.

IND vs NZ New Zealand set India a target of 359 runs
IND vs NZ : भारताला १२ वर्षांचा विजयरथ कायम राखण्याचे आव्हान, विजयासाठी न्यूझीलंडने दिले ३५९ धावांचे लक्ष्य
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Western Australia Just Lose 8 Wickets for Just One Run in Domestic one day cup 6 Batters Goes on Duck vs Tasmania
VIDEO: ५२/२ ते ५३ वर ऑल आऊट, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने एका धावेच्या अंतरात गमावल्या ८ विकेट्स
Washington Sundar credit given Ashwin in IND vs NZ Pune Test Performance
Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदरने कोणाच्या मदतीने घेतल्या सात विकेट्स? कर्णधार किंवा प्रशिक्षकला नव्हे, ‘या’ खेळाडूला दिले श्रेय
Washington Sundar 7 wickets and 5 batters bowled records in IND vs NZ 2nd Test
Washington Sundar : त्रिफळाचीत करत ७ विकेट्स आणि खास पराक्रम
india new zealand second test cricket match from today
भारताचे मालिकेत बरोबरीचे लक्ष्य; न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून; खेळपट्टीचे स्वरूप गुलदस्त्यात
IND vs NZ Rohit Sharma name has become the embarrassing record
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माला आणखी एक धक्का, नावावर झाली ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
India New Zealand Test Series A chance for India to make a comeback in the first Test cricket match sport news
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका: भारताची कडवी झुंज; तब्बल ३५६ धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावात फलंदाजांचा प्रतिकार

हेही वाचा – VIDEO : शेवटच्या कसोटीत रॉस टेलर झाला भावूक, राष्ट्रगीत सुरू असताना आवरता आले नाही अश्रू!

दुखापत असूनही स्टोक्सने दमदार खेळी करत १० चौकार आणि एक षटकार लगावला. इंग्लंडलाही नशिबाची साथ लाभली. पाचव्या दिवशी पावसामुळे खेळात व्यत्यय आला. ऑस्ट्रेलियाच्या ३८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने एकही विकेट न गमावता ३० धावा केल्या, परंतु सकाळच्या सत्रात सलामीवीर हसीब हमीद (९) आणि डेव्हिड मलान (४) यांनी निराशा केली. पॅट कमिन्सच्या चेंडूवर कॅरीने हमीदला जीवदान दिले, पण त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. ऑफस्पिनर नाथन लायनने आपल्या तिसऱ्या षटकात मलानला बोल्ड करून इंग्लंडची धावसंख्या २ बाद ७४ अशी केली. सलामीवीर क्रावलीने १३ चौकारांसह ७७ धावा केल्या.

हा रंगतदार सामना पाहून महाविकास आघाडी सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही एक ट्वीट केले. ”म्हणूनच आपण कसोटी क्रिकेट साजरे केले पाहिजे. आज अ‍ॅशेसच्या शेवटची १० षटकांत क्षेत्ररक्षण, कौशल्य आणि खेळाच्या दोन्ही बाजूंची तीव्रता दिसली”, असे ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

संक्षिप्त धावफलक

  • नाणेफेक – ऑस्ट्रेलिया (फलंदाजी)
  • ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) – ८ बाद ४१६ (डाव घोषित)
  • इंग्लंड (पहिला डाव) – सर्वबाद २९४
  • ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) – ६ बाद २६५ (डाव घोषित)
  • इंग्लंड (दुसरा डाव) – ९ बाद २७० (सामना ड्रॉ)