शाब्दिक चकमकीनंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे द्वंद्व बुधवारपासून मैदानावर रंगणार आहे. अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीला कार्डिफ स्टेडियमवर बुधवारपासून सुरुवात होत आहे. गतवर्षी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ५-० असा धुव्वा उडवत चषकावर नाव कोरले होते, परंतु गेल्या १४ वर्षांत त्यांना इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका जिंकता आलेली नाही आणि ती उणीव भरून काढण्याच्या निर्धाराने ऑस्ट्रेलियन संघ सज्ज झाला आहे.
२००१मध्ये ऑस्ट्रेलियाने ४-१ अशा फरकाने इंग्लंडमध्ये अखेरची अ‍ॅशेस मालिका जिंकली होती. मायकेल क्लार्क याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडला कडवे आव्हान देण्यास तयार आहे. दुसरीकडे अ‍ॅलेस्टर कुक याच्या नेतृत्वाखाली यजमान गतवर्षी झालेल्या मानहानीकारक पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, इंग्लंडचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांना हा वचपा काढणे तितके सोपे जाणार नाही हे निश्चित मानले जात आहे.

Story img Loader