प्रतिभावान फलंदाज मार्नस लबूशेनने (३०५ चेंडूंत १०३ धावा) साकारलेल्या कारकीर्दीतील सहाव्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसावरही वर्चस्व गाजवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या प्रकाशझोतातील कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची २ बाद १७ धावा अशी अवस्था झाली असून ते पहिल्या डावात अद्यापही ४५६ धावांनी पिछाडीवर आहेत.

तत्पूर्वी, गुरुवारच्या २ बाद २२१ धावांवरून पुढे खेळताना लबूशेनने प्रकाशझोतातील कसोटीत तीन शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरण्याचा मान मिळवला. लबूशेन बाद झाल्यावर कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही (९३) शतकाची संधी होती. परंतु डेव्हिड वॉर्नरप्रमाणे (९५) त्याचेही शतक हुकले. अखेरीस अ‍ॅलेक्स कॅरी (५१), मिचेल स्टार्क (नाबाद ३९) आणि पदार्पणवीर मायकल नीसर (३५) यांनी फटकेबाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने ९ बाद ४७३ धावांवर पहिला डाव घोषित केला.

संक्षिप्त धावफलक

’  ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १५०.४ षटकांत ९ बाद ४७३ डाव घोषित (मार्नस लबूशेन १०३, डेव्हिड वॉर्नर ९५, स्टीव्ह स्मिथ ९३; बेन स्टोक्स ३/११३)

’  इंग्लंड (पहिला डाव) : ८.४ षटकांत २ बाद १७ (हसीब हमीद ६, रोरी बन्र्स ; मायकल नीसर १/४)

इंग्लंडचे आठ गुण वजा

दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या अ‍ॅशेस कसोटीत षटकांची संथ गती राखल्याबद्दल इंग्लंडच्या खात्यातून पाचऐवजी आठ गुण वजा होणार आहेत, असे ‘आयसीसी’ने जाहीर केले. गेल्या आठवड्यात झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत पाच षटके कमी टाकल्याने इंग्लंडच्या सर्व खेळाडूंचे १०० टक्के सामन्याचे मानधन कापण्यात आले. त्याशिवाय जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतून त्यांच्या खात्यातील पाच गुण वजा करण्यात आले. मात्र शुक्रवारी ‘आयसीसी’ने चूक सुधारत इंग्लंडने आठ षटके कमी टाकल्याचे सिद्ध केले. त्यामुळे त्यांचे आणखी तीन गुण वजा करण्यात आले.