अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने दणक्यात पुनरागमन केलं आहे. दुखापतीमुळे स्मिथ तिसऱ्या कसोटीला मुकला होता. मात्र मँचेस्टरच्या मैदानावर संघाला गरज असताना स्मिथने खेळपट्टीवर पाय रोवत शतकी खेळी केली. कसोटी कारकिर्दीतलं स्मिथचं हे २६ वं शतक ठरलं. या शतकी खेळीदरम्यान स्मिथने सचिन तेंडुलकर-सुनिल गावसकर, मॅथ्यू हेडन या दिग्गज फलंदाजांनाही मागे टाकलं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत २६ वं शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मिथ दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने १२१ डावांमध्ये ही किमया साधली आहे. सचिन आणि गावसकर यांना ही कामगिरी करुन दाखवण्यासाठी अनुक्रमे १३६ आणि १४४ डाव लागले होते.

स्टिव्ह स्मिथने या खेळीदरम्यान आपला प्रतिस्पर्धी विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे. विराट कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये २५ शतकं जमा आहेत. स्मिथचं हे कसोटी क्रिकेटमधलं २६ वं शतक ठरलं आहे.

अवश्य वाचा –  Ashes Test Series : स्टिव्ह स्मिथचं दमदार शतक, विराट कोहलीला टाकलं मागे

Story img Loader