Ashish Nehra Statement on Hardik Pandya: भारतीय संघाला टी-२० फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादवच्या हा नवा कर्णधार मिळाला आहे. रोहित शर्माच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर हार्दिक पंड्या हा भारतीय संघाचा कर्णधार होण्याचा सर्वात मोठा दावेदार होता. मात्र नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नियुक्तीनंतर सूर्यकुमार यादवला प्राधान्य दिले. त्यामुळे हार्दिक पंड्याला कर्णधारपद देता येऊ शकले नाही. हा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटला पण गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी सांगितले की, हार्दिक फिटनेसमुळे या शर्यतीत मागे पडला आहे. त्यांना कर्णधार म्हणून नेहमी उपलब्ध असणारा खेळाडू हवा होता. आता आयपीएलमध्ये हार्दिकसोबत काम केलेल्या आशिष नेहराने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – भारताचा दिग्गज खेळाडू GT चा कोच म्हणून IPL मध्ये परतणार; आशिष नेहरा नाराज? संपूर्ण कोचिंग स्टाफचा मोठा निर्णय

Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Bhokardan , Raosaheb Danve,
‘माजी’ झाल्याने फरक पडत नाही, फक्त नाव पुरेसे, माजी खासदार रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”

नेहराने स्पोर्ट्स तकशी संवाद साधताना सांगितले की, हार्दिकला कर्णधारपद न दिल्याने आश्चर्य नाही वाटले असे त्यांनी म्हटले तर यामागचे कारणही त्यांनी सांगितले. आता नवीन प्रशिक्षक आल्याने एक नवीन कल्पनाही समोर आली आहे. प्रत्येक प्रशिक्षकाची स्वतःची वेगळी विचारसरणी असते. हार्दिकला कर्णधारपद न दिल्याबद्दल प्रतिक्रिया देताना नेहरा म्हणाला, क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहताना हा निर्णय काही आश्चर्यकारक नव्हता, अशा गोष्टी घडतात. विश्वचषकात हार्दिक पंड्या उपकर्णधार होता पण नव्या प्रशिक्षकाने पदभार स्वीकारला त्याच्यासोबत नवीन विचारही आले. प्रत्येक प्रशिक्षकाची, प्रत्येक कर्णधाराची विचार करण्याची पद्धत वेगळी असते.

हेही वाचा – Mohammad Shami: “१९व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून…” मोहम्मद शमीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, मित्राचा धक्कादायक खुलासा

“अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांनी या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले आहे, जी चांगली गोष्ट आहे. हार्दिक एकच फॉरमॅट खेळतो. तो एकदिवसीय सामने खेळतो पण कमी खेळताना दिसतो. त्यामुळे व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या हा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. हार्दिक पंड्या प्लेईंग इलेव्हनमध्ये असतो तेव्हा संघात चार वेगवान गोलंदाज असतात, ज्यामुळे संघात समतोल राखला जातो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम नसतो, हे लक्षात असलं पाहिजे. असे नेहराने सांगितले.

“फक्त हार्दिक पांड्याच नाही, तर जेव्हा तुमच्याकडे अनेक सामने असतील तेव्हा बदल होतील. अगदी ऋषभ पंतने कर्णधारपद भूषवले आहे, केएल राहुलनेही कर्णधारपद भूषवले आहे,” संघाबद्दल सांगताना आशिष नेहरा पुढे म्हणाला.

हेही वाचा – Gautam Gambhir: “शिफारसीमुळे कोच…”, गौतम गंभीर प्रशिक्षक होताच पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने केले आरोप, पाहा नेमकं काय म्हणाला?

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून ३ सामन्यांची टी-२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. येत्या २७ जुलैपासून टी-२० मालिका सुरू होईल. सूर्यकुमार यादव या मालिकेत संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. तर भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा पहिलाच दौरा आहे.

Story img Loader