ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या ओव्हलवर खेळला जात आहे. हा दिवस-रात्र सामना असून गुलाबी चेंडूने खेळवला जात आहे. या सामन्यात पॅट कमिन्सच्या जागी कर्णधार असलेल्या स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत गुलाबी चेंडूने ८ कसोटी सामने खेळले असून ते सर्व त्यांनी जिंकले आहेत. अॅडलेडमध्येही आपली विजयरथ मोहीम थांबू नये यासाठी ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील आहे. ब्रिस्बेनमधील गाबा येथे पहिली कसोटी नऊ गडी राखून जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीतही पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर ९५ धावांची खेळी करून बाद झाला, पण तंबूत परतताना त्याने सर्वांची मने जिंकली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in