Ashton Agar batting with one hand video viral : ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर ॲश्टन अगरने सोमवारी असे काही केले की, ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. शेफिल्ड शिल्डमध्ये व्हिक्टोरियाविरुद्धच्या सामन्यात खांद्याला दुखापत होऊनही त्याने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात एका हाताने फलंदाजी केली. अशा प्रकारे त्यांनी आपल्या शौर्याचे अनोखे उदाहरण मांडले आहे. आगरला फलंदाजी करतानाही खूप वेदना होत होत्या, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि शेवटच्या विकेटसाठी जोएल कर्टिससोबत १५ धावा जोडल्या. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ॲश्टन अगरचा व्हिडीओ व्हायरल –

कर्टिस २३९ चेंडूत ११९ धावा करून नाबाद राहिला, ज्यात त्याच्या खेळीत १६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या सॅम इलियटने आगरला बाद. अगर आणि कर्टिसच्या खेळीच्या जोरावर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा डाव ३२५ धावांवर संपला. अर्थात, अगरला या सामन्यात एकही धाव करता आली नाही, पण विकेटवर राहून त्याने आपले धैर्य साऱ्या जगाला दाखवून दिले.

हेही वाचा – AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला सलग तिसऱ्या सामन्यात धूळ चारत केला विश्वविक्रम! ‘या’ बाबतीत न्यूझीलंडला टाकले मागे

अगरला राष्ट्रीय संघात मिळाली नाही संधी –

इलियटशिवाय वेगवान गोलंदाज फर्गस ओ’नीलने व्हिक्टोरियाकडून ५६ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू टॉड मर्फी आणि झेवियर क्रोन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. या सामन्यात मार्कस हॅरिस आणि पीटर हँड्सकॉम्बच्या अर्धशतकांच्या जोरावर व्हिक्टोरियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने दिलेले लक्ष्य आठ विकेट्स गमावून सहज गाठले. मात्र, अगर दुखापतीमुळे मैदानात उतरला नाही. येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही.

हेही वाचा – Doug Bracewell : सचिन-सेहवागची विकेट पटकावलेल्या न्यूझीलंडच्या गोलंदाजावर बंदी, कोकेन सेवन केल्याप्रकरणी आढळला दोषी

नॅथन लायनला मिळाली संधी –

अनुभवी नॅथन लायनवर येथे स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून संघाने विश्वास व्यक्त केला आहे. अगरने अलीकडेच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या तस्मानियाविरुद्धच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आणि अर्धशतक झळकावले. त्याने केवळ फलंदाजीत नव्हे तर गोलंदाजीतही चार विकेट्स घेऊन संघाच्या विजयात योगदान दिले होते. तो शेवटचा राष्ट्रीय संघाकडून टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होते, जेव्हा त्याला मिचेल स्टार्कच्या जागी संधी मिळाली होते.