भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झालेली आहे. दुबईत खेळवण्यात येणाऱ्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात, बांगलादेशविरुद्ध धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला यष्टींमागचा ८०० वा बळी मिळवला आहे. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत धोनी आता तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये पहिल्या स्थानी मार्क बाऊचर ९९८ बळींसह तर दुसऱ्या स्थानी अॅडम गिलख्रिस्ट ९०५ बळींसह कायम आहेत.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 Final : बांगलादेशच्या लिटन दासची एकाकी झुंज, झळकावलं वन-डे मधलं पहिलं शतक

नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, बांगलादेशी सलामीवीरांनी आपल्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र पहिला गडी माघारी परतल्यानंतर बांगलादेशच्या डावाला खिंडार पडलं. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या पवित्र्यात असलेल्या बांगलादेशी कर्णधार मश्रफी मोर्ताझाला धोनीने चपळाईने यष्टीचीत करुन ८०० व्या बळीची नोंद केली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

Story img Loader