आशिया चषकातील साखळी सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं १६३ धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी लिलया पार केलं. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली, त्याला सलामीवीर शिखर धवनने ४६ धावा काढून चांगली साथ दिली. अर्धशतकी खेळी झाल्यानंतर रोहित शर्मा शादाब खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. तर फईम अश्रफने शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर विजयासाठी आवश्यक असणारं आव्हान अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक जोडीने पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. फईम आणि शादाबचा अपवाद वगळता एकही गोलंदाज आपली छाप पाडू शकला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्याआधी भुवनेश्वर कुमार, केदार जाधव आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ अवघ्या १६२ धावांमध्ये कोलमडला. दुबईत सुरु असलेल्या आशिया चषकात हाँग काँगवर मात केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. काही ठराविक भागीदाऱ्यांचा अपवाद वगळता पाकिस्तानचा डाव आकार घेऊ शकला नाही. भुवनेश्वर कुमारने नव्या चेंडूवर खेळताना पाकिस्तानला सुरुवातीला दोन धक्के दिले. यानंतर बाबर आझम आणि शोएब मलिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला.
मात्र कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाबर आझम त्रिफळाचीत होऊन माघारी परतला आणि पाकिस्तानची घसरगुंडी सुरु झाली. यानंतर केदार जाधवच्या कामचलाऊ गोलंदाजीवर मोठे फटके खेळण्याच्या नादात पाकचे फलंदाज विकेट गमावून माघारी परतले. अखेरच्या फळीत मोहम्मद आमीर आणि फईम अश्रफ यांनी ३७ धावांची छोटेखानी भागीदारी रचत संघाला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र बुमराह आणि भुवनेश्वरने पाकिस्तानच्या शेपटाला फारसं वळवळण्याची संधीच दिली नाही. अखेर ४३.१ षटकात पाकिस्तानचा संघ १६२ धावांत माघारी परतला.
Live Blog

Highlights
- 18:40 (IST)
पाकिसà¥à¤¤à¤¾à¤¨à¤šà¤¾ तिसरा गडी माघारी, बाबर आà¤à¤® तà¥à¤°à¤¿à¤«à¤³à¤¾à¤šà¥€à¤¤
???? ??????????? ?????? ???? ???????? ??????? ??. ?????? ???????? ?????????? ???? ??? ?????????? ???? ??????. ? ??????? ????? ??????? ?????. ???-????????? ??????? ????????? ?? ??????? ????????
- 18:28 (IST)
हारà¥à¤¦à¤¿à¤• पांडà¥à¤¯à¤¾ जायबंदी, à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤²à¤¾ मोठा धकà¥à¤•à¤¾
?? ???? ??????? ????? ????? ???? ?????? ??????? ??????? ???????, ????????? ??????????? ??????????? ????. ????????? ?????????? ???
- 18:07 (IST)
बाबर आà¤à¤® - शोà¤à¤¬ मलिक जोडीने संघाचा डाव सावरला
????? ??? ?????? ?????? ??????????? ???? ?????? ?????? ??????????? ???????? ??? ?????? ??? ????????? ??????? ????. ??????? ?????? ???? ??????? ?????? ?????? ??? ????. ?????? ????????????? ??????? ????????? ?? ??????? ????????

दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडू जोडीने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारत ८ गडी राखून विजयी
फईम अश्रफच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेलबाद, अवघ्या ४ धावांनी शिखरचं अर्धशतक हुकलं
अर्धशतक झळकावल्यानंतर फिरकीपटू शादाब खानच्या गोलंदाजीवर रोहित त्रिफळाचीत होऊन माघारी. शादाबचा गुगली चेंडू रोहितला समजलाच नाही.
पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत रोहित शर्माचं आक्रमक अर्धशतक, भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल
रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने पाकिस्तानी गोलंदाजांची खेळी संयमीपमे खेळून काढत भारताला चांगली सुरुवात करुन दिली आहे. रोहितने मैदानावर आपले पाय स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करत पाकच्या गोलंदाजांवर दबाव आणायला सुरुवात केली आहे.
उस्मान खानचा त्रिफळाचीत होऊन माघारी, पाकिस्तानचा संघ १६२ धावांवर संपुष्टात. भारताला विजयासाठी १६३ धावांचं आव्हान
भुवनेश्वरच्या खात्यात आणखी एक बळी, हसन अली बाद
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर फईम अश्रफ बाद
आमिर आणि अश्रफमध्ये ३७ धावांची छोटेखानी भागीदारी, पाकिस्तानने ओलांडला १५० धावांचा टप्पा
केदार जाधवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात शादाब खान यष्टीचीत, पाकिस्तानचा सातवा गडी माघारी
केदार जाधवच्या गोलंदाजीवर पाकिस्तानचा आसिफ अली धोनीकडे झेल देत माघारी. पाकिस्तानचा सहावा गडी माघारी
अंबाती रायडूने केलेल्या अचूक फेकीमुळे शोएब मलिक धावबाद होऊन माघारी. पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी
केदार जाधवच्या गोलंदाजीवर मनिष पांडेने सीमारेषेवर सरफराज अहमदचा सुरेख झेल पकडला. पाकिस्तानचा चौथा गडी माघारी
अखेर पाकिस्तानची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाबर आझम त्रिफळाचीत होऊन माघारी. ३ धावांनी आझमचं अर्धशतक हुकलं. आझम-मलिकमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी
१८ व्या षटकातला पाचवा चेंडू टाकत असताना हार्दिक पांड्या जायबंदी, हार्दिकला स्ट्रेचवरुन मैदानाबाहेर नेलं. भारताच्या चितेंमध्ये वाढ
पहिले दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर शोएब मलिकने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत संघाचा डाव सावरण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने बाबर आझमनेही मलिकला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी
भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर फखर झमान मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी. पाकिस्तानचा दुसरा गडी तंबूत परतला
भुवनेश्वर कुमार याच्या गोलंदाजीवर पाकिस्तानने पहिला गडी गमावला. माजी कर्णधार इंझमाम उल हक याचा भाचा असलेला इमाम उल हक हा २ धावांवर बाद झाला. धोनीने यष्ट्यांमागे त्याचा झेल टिपला
हायव्होल्टेज सामन्यात पाक कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात आज पाकने आपल्या संघात कोणतेही बदल केलेले नाहीयेत.