सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार रोहित शर्माने झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने आशिया चषकात पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात केली आहे. दुबईच्या मैदानात Super 4 गटात खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकवर ९ गडी राखून मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं २३८ धावांचं आव्हान भारताने रोहित-शिखरच्या भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीपासून सावध सुरुवात करत खेळपट्टीवर आपले पाय रोवले. यानंतर दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत रोहित-शिखरने धावा कुटल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपलं शतक झळकावल्यानंतर शिखर धवन चोरटी धाव घेत असताना धावबाद होऊन माघारी परतला. शिखरने १०० चेंडूत ११४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने कर्णधार रोहित शर्माने १११ धावांची नाबाद खेळी केली. शिखर धवनला आक्रमक खेळीसाठी सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

अखेरच्या षटकात जसप्रीत बुमराहने केलेल्या माऱ्यामुळे भारताने Super 4 गटात पाकिस्तानचा २३७ धावांवर रोखलं. शोएब मलिकने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर पाकिस्तानने वेळेतच आपला डाव सावरत भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. नाणेफेक जिंकून सामन्यात पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानची सुरुवात काहीशी अडखळती झाली. पहिले ३ फलंदाज झटपट माघारी परतले, मात्र यानंतर शोएब मलिकने कर्णधार सरफराज अहमदच्या साथीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. शोएब आणि सरफराजने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत धावांचा ओघ वाढवला. या भागीदारीमुळे पाकिस्तानने आश्वासक धावसंख्या ओलांडली. शोएब मलिकने ९० चेंडूत ७८ तर कर्णधार सरफराजने ४४ धावांची खेळी केली.

मात्र ही जोडी फुटताच, पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. अखेरच्या फळीत आसिफ अलीने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र जसप्रीत बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही. भारताकडून बुमराह, चहल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २-२ बळी घेतले. यानंतर भारताचा पुढचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

Live Blog

Highlights

  • 19:54 (IST)

    जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर शोएब मलिक माघारी

    ?????????? ?????????? ?????????? ??????????? ????????? ???? ???? ??????. ?????? ????? ???, ??????????? ?????? ??? ??????

  • 19:43 (IST)

    कुलदीपने पाकची जोडी फोडली, सरफराज माघारी

    ?????? ???????? ?????????? ??????? ?????? ??????, ??????????? ???? ??? ??????

  • 19:19 (IST)

    शोएब मलिकचं अर्धशतक - पाकिस्तानचा डाव सावरला

    ????? ? ?????? ???? ?????? ??????????? ???? ?????? ??????? ?????? ???????? ?????? ???????? ???????? ??? ?????? ??? ??????. ?????? ??????????? ?????? ????? ??? ???? ?????? ???????.

23:54 (IST)23 Sep 2018
रोहित - रायडू जोडीकडून विजयाची औपचारिकता पूर्ण

शिखर धवन बाद झाल्यानंतर रोहित आणि अंबाती रायडूने उरलेल्या धावांचं लक्ष्य सहज पार करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

23:46 (IST)23 Sep 2018
रोहित शर्माचं शतक

शिखर धवन पाठोपाठ भारताचा कर्णधार रोहित शर्माचं शतक, पाकिस्तानी गोलंदाजांनी विजयाची आशा सोडली

23:28 (IST)23 Sep 2018
भारताला पहिला धक्का, शिखर धवन धावबाद

चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शिखर धवन धावबाद, भारताचा पहिला गडी माघारी

23:26 (IST)23 Sep 2018
शिखर धवनचं शतक, भारत विजयाच्या नजीक

पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत शिखर धवनचं सामन्यात शतक, भारत विजयाच्या नजीक.

स्पर्धेतलं शिखरचं दुसरं शतक

22:41 (IST)23 Sep 2018
रोहित - शिखरमध्ये शतकी भागीदारी, रोहित शर्माचंही अर्धशतक

पाकिस्तानी गोलंदाजांचा नेटाने सामना करत भारताच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी रचत भारताची बाजू वरचढ केली आहे. शिखर धवनपाठोपाठ रोहित शर्माचंही अर्धशतक

22:22 (IST)23 Sep 2018
शिखर धवनचं अर्धशतक, भारताची आश्वासक सुरुवात

रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीकडून डावाची आश्वासक सुरुवात. शिखर धवनचं अर्धशतक

20:25 (IST)23 Sep 2018
५० षटकात पाकिस्तानची २३७ धावांपर्यंत मजल

भारताला विजयासाठी २३८ धावांचं आव्हान

20:24 (IST)23 Sep 2018
अखेरच्या षटकात पाकिस्तानला सातवा धक्का

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर शादाब खान त्रिफळाचीत

20:02 (IST)23 Sep 2018
पाकिस्तानचा सहावा गडी माघारी

युझवेंद्र चहलने टाकलेल्या गुगलीवर आसिफ अली फसला, पाकिस्तानचा सहावा गडी माघारी

19:54 (IST)23 Sep 2018

बुमरहाच्या गोलंदाजीवर यष्टींमागे खेळण्याच्या प्रयत्नात शोएब मलिक झेलबाद. धोनीने घेतला झेल, पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी

19:43 (IST)23 Sep 2018

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कर्णधार सरफराज झेलबाद, पाकिस्तानचा चौथा गडी माघारी

19:19 (IST)23 Sep 2018

पहिले ३ फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर शोएब मलिकने कर्णधार सरफराज अहमदच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत शोएब मलिकचं अर्धशतक.

18:12 (IST)23 Sep 2018
पाकिस्तानला तिसरा धक्का, बाबर आझम धावचीत

चोरटी धाव घेण्याच्या नादात कर्णधार सरफराज अहमद आणि बाबर आझममध्ये गोंधळ उडाला, बाबर आझम धावचीत

18:10 (IST)23 Sep 2018
कुलदीपने पाकची जोडी फोडली

खेळपट्टीवर जम बसवू पाहणाऱ्या फखर झमानला पायचीत करत कुलदीपने पाकची जमलेली जोडी फोडली. पाकिस्तानचा दुसरा गडी माघारी

18:09 (IST)23 Sep 2018
फखर झमान - बाबर आझम जोडीची छोटेखानी भागीदारी

दुसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये ३१ धावांची भागीदारी, पाकिस्तानने ओलांडला ५० धावांचा टप्पा

17:39 (IST)23 Sep 2018
पाकिस्तानची संथ सुरुवात, चहलने पाकची जोडी फोडली

इमाम उल हक आणि फखार झमान जोडीने पाकिस्तानच्या डावाची सावध सुरुवात केली. मात्र चहलने इमाम उल हकला पायचीत करुन माघारी धाडलं. भारतीय खेळाडूंनी केलेलं अपील पंचांनी फेटाळून लावलं होतं, मात्र धोनीच्या सल्ल्याने रोहित शर्माने पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलं. तिसऱ्या पंचांच्या पाहणीत इमाम बाद असल्याचं समोर आलं. पाकिस्तानला पहिला धक्का

16:43 (IST)23 Sep 2018
पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

साखळी फेरीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर, Super 4 गटातल्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या संघात २ बदल केले आहेत. भारताने मात्र आपल्या संघात कोणतेही बदल केले नाहीयेत.