दुबईत सुरु असलेल्या आशिया चषकात, Super 4 गटातील पहिल्या सामन्यात भारताच्या शिखर धवनने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पंक्तीत शिखर धवनला स्थान मिळालं आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात शिखरने ४ झेल घेतले. नझमुल हुसेन, शाकिब अल हसन, मेहदी हसन, मुस्तफिजूर रेहमान या ४ खेळाडूंचे झेल शिखर धवनने क्षेत्ररक्षणादरम्यान पकडले.

शिखर धवन व्यतिरीक्त असा विक्रम करणारे भारतीय खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत –

  • सुनिल गावसकर – विरुद्ध पाकिस्तान (शारजा १९८५)
  • मोहम्मद अझरुद्दीन – विरुद्ध पाकिस्तान (टोरांटो १९९७)
  • सचिन तेंडुलकर – विरुद्ध पाकिस्तान (ढाका १९९९८)
  • राहुल द्रविड – विरुद्ध वेस्ट इंडिज (टोरांटो १९९९)
  • मोहम्मद कैफ – विरुद्ध श्रीलंका (जोहान्सबर्ग २००३)
  • व्ही. व्ही. एस. लक्ष्मण – विरुद्ध झिम्बाब्वे (पर्थ २००४)

नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात शिखर धवनला चांगली कामगिरी करता आली नव्हती, मात्र याची सर्व कसर शिखरने आशिया चषकात भरुन काढली आहे. एका शतकासह शिखर आतापर्यंत आशिया चषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. बांगलादेशवर मात केल्यानंतर भारताची आज पुन्हा एकदा पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात शिखर धवन आणि भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader