यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढत चांगलीच अटीतटीची झाली. या सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे अफागाणिस्तानला पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या १७६ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने चार गडी राखून गाठले. श्रीलंकेच्या पथुम निसांका (३५), कुसल मेंडिस (३६) यांनी तसेच भानुका राजपक्षे यांनी मोठी फटकेबाजी केल्यामुळे श्रीलंकेला विजयाची गोडी चाखता आली. विशेष म्हणजे या विजयासाठी श्रीलंकेने यूएईमधील शारजाह या मैदानावरील आतापर्यंतच्या सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पठलाग केला आहे.

हेही वाचा >>भारताचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर? होणार मोठी शस्त्रक्रिया

अफगाणिस्तानने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा धारण केला. सलामीला आलेल्या पथुम निसांका (३५), कुसल मेंडिस (३६) यांनी विजयासाठी मोठे योगदान दिले. दुसऱ्या विकेटसाठी आलेला चरित असलंका (८) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मात्र दानुष्का गुनाथिलका (३३), भानुका राजपक्षे यांनी संघाला विजयापर्यंत नेलं. श्रीलंकेने शारजाह मैदानावरील आतापर्यंतच्या सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. याआधी विजयासाठी कोणत्याही संघाने १७६ धावांपर्यंतचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले नव्हते.

हेही वाचा >> Dhanashree Verma Surgery : धनश्री वर्मावर करण्यात आली शस्त्रक्रिया, फोटो केला शेअर; नेमकं काय झालं होतं?

याआधी सुरुवातीला नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंत फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तान संघातील रहमानउल्ला गुरबाज, इब्राहीम झरदार या फलंदाजांनी चांगला खेळ केला. गुरबाजने ४५ चेंडुंमध्ये सहा षटकार आणि चार चौकार लगावत ८४ धावा केल्या. तर इब्राहीमने ३८ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. हे दोन फलंदाज वगळता अफगाणिस्तानचा कोणताही फलंदाज चांगली खेळी करू शकला नाही. सलामीला आलेला. हजरतुल्ला झाझाई (१३) स्वास्तात बाद झाला. तर तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या नजीबउल्लाह झदरान याने १७ धावा केल्या. नाबी (१) खास कामगिरी करू शकला नाही. तर राशीद खान (९) नाबाद राहिला.

Story img Loader