यूएईमध्ये सुरू असलेल्या श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र श्रीलंकेनेदेखील तेवढाच आक्रमक खेळ करत ही धावसंख्या गठत चार गडी राखून विजय मिळवला. आघाडीच्या फलंदाजांनी श्रीलंकेसाठी विजयाची वाट सुकर करून दिली. मात्र शेवटच्या कही षटकांत संघ अडचणीत आलेला असताना वानिंदू हसरंगाने चोख भूमिका बजावत श्रीलंकेच्या चेहऱ्यावर हसू आणले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> भारताचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर? होणार मोठी शस्त्रक्रिया

अफगाणिस्तानने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा धारण केला. सलामीला आलेल्या पथुम निसांका (३५), कुसल मेंडिस (३६) यांनी विजयासाठी मोठे योगदान दिले. दुसऱ्या विकेटसाठी आलेला चरित असलंका (८) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मात्र दानुष्का गुनाथिलका (३३), भानुका राजपक्षे (३१) यांनी संघाला विजयापर्यंत नेलं. त्यानंतर १९ व्या षटका श्रीलंका संघ अडचणीत आला.

हेही वाचा- Asia Cup 2022 : श्रीलंकेची दमदार कामगिरी, अफगाणिस्तानवर मिळवला रोमांचकारी विजय

त्यानंतर फलंदाजीसाठी आल्यानंतर वानिंदू हसरंगाने श्रीलंकेसाठी विजयी कामगिरी केली. त्याने शेवटच्या षटकांत अवघ्या ९ चेंडूंमध्ये १६ धावा केल्या. मैदानावर असताना फलंदाजीदरम्यान त्याने तीन चौकार लगावले. परिणामी श्रीलंकेचा विजय झाला.