आजपासून (२७ ऑगस्ट) आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत रविवारी (२८ ऑगस्ट) पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत-पाकिस्तान हे संघ आमनेसामने येत आहेत. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांकडून कसोशीने प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानला शाहीन शाह आफ्रिदीनंतर मोहम्मद वसीमच्या रुपात आणखी एक झटका बसला आहे. पायाच्या दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदी ही स्पर्धा खेळू शकरणार नाही. असे असतानाच वेगवान गोलंदाज मोहम्मद वासीमलाही दुखापत झाली असून तोदेखील या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

हेही वाचा >> सगळे म्हणतात शतक ठोकलंच पाहिजे, पण विराट कोणत्या परिस्थितीतून जातोय? पहिल्यांदाच थेट भाष्य करत म्हणाला, “महिनाभर…”

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

शाहीन आफ्रिदीनंतर आता पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू दुखातपग्रस्त झाला असून तो स्पर्धेच्या बाहेर पडला आहे. मोहम्मद वसीमला पाठीचा त्रास जाणवत आहे. २५ ऑगस्ट रोजी सराव करताना त्याला हा त्रास सुरू झाला होता. दरम्यान, या दुखापतीनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर दुखापतीमुळे तो आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शाहीन आफ्रिदीनंतर महोम्मद वसीम या स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे याचा फटका पाकिस्तानी संघाला बसण्याची शक्यता आहे. दोन आघाडीचे वेगवान गोलंदाज नसल्यामुळे भारतासाठी ही जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> Asia Cup 2022 : आजपासून आशिया चषकाला सुरूवात; जाणून घ्या भारतात कुठे आणि किती वाजता बघता येईल सामने?

दरम्यान, आज या स्पर्धेला सुरुवात होत असली तरी भारतीयांसाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने २८ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. कारण २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि भारत संघ एकमेकांना भिडणार असून या सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये ही स्पर्धा होत आहे.