आजपासून (२७ ऑगस्ट) बहुप्रतिक्षित अशा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होत आहे. तर रविवारी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येतील. आपला पहिला सामना जिंकण्यासाठी या दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या तर रात्री नेटमध्ये सराव करत आहे. सराव करतानाचा एक व्हिडीओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>Asia Cup 2022 : शाहीन आफ्रिदीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का, ‘हा’ वेगवान गोलंदाज स्पर्धेतून बाहेर

आशिया चषकातील सामने टी-२० फॉर्मेटमध्ये २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधित खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा सहा देशांदरम्यान खेळवली जात असली तर आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून या स्पर्धेमधील कामगिरी सर्वच संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरी या स्पर्धेचं जेतेपद पटकावण्यासाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार असल्यामुळे संपूर्ण देशाचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. असे असताना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मैदानात कसून सराव करतोय. पंड्याने आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स या नव्याकोऱ्या संघाचे नेतृत्व करत संघाला थेट जेतेपद मिळवून दिले होते. याच कारणामुळे त्याच्या आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीकडेही तेवढ्याच उत्सुकतेने पाहिले जात आहे.

सगळे म्हणतात शतक ठोकलंच पाहिजे, पण विराट कोणत्या परिस्थितीतून जातोय? पहिल्यांदाच थेट भाष्य करत म्हणाला, “महिनाभर…”

आशिया चषक स्पर्धेचे सामने कुठे पाहता येतील?

आशिया चषकातील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर होणार आहे. तसेच डिझ्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील.

ग्रुप स्टेज सामन्यांचे वेळापत्रक

27 ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
28 ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट – बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान
31 ऑगस्ट – भारत विरुद्ध हॉंगकाँग
1 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध हॉंगकाँग