यूएईमध्ये सध्या आशिया चषक स्पर्धा सुरू असून सुपर-४ सामने खेळवले जात आहेत. आज भारत-अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, हा सामना सुरू होण्याआधीच स्टेडियमच्या बाहेर मोठी आग लागली असून आगीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
हेही वाचा >>>> पाकिस्तानच्या क्रिकेटरला भारताच्या ‘डिंपल गर्ल’ची भुरळ, खास फोटो शेअर करत म्हणाला; “माझी सर्वांत…”
मिळालेल्या माहितीनुसार दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमबाहेर एका इमारतीला मोठी आग लागली आहे. या आगीमुळे स्टेडियम परिसरात धूर पसरला आहे. येथे अफगाणिस्तान-भारत यांच्यात सायंकाळी ७.३० वाजता सामना होणार आहे. या सामन्यासाठीची तयारीदेखील पूर्ण झाली आहे. मात्र याआधीच स्टेडियमच्या बाहेर मोठी आग लागल्यामुळे सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीमध्ये कोणताही जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचा >>>> ‘भारताचे खेळाडूही आम्हाला मिठ्या मारतात, पण अफगाणिस्तानचे मात्र…’ शोएब अख्तरने व्यक्त केली नाराजी
दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आलेले आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना औपचारिकता म्हणून खेळवण्यात येणार आहे. तर येत्या ११ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत होणार आहे.