आशिया चषक स्पर्धेत सध्या सुपर-४ फेरीतील सामने सुरू आहेत. यूएईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज भारताचा अफगाणिस्तानविरोधात सामना आहे. याआधी भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधातील सलग दोन सामने गमावल्यामुळे अफगाणिस्तानसोबतच भारताचेही आव्हान संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे आजचा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळवला जाणार आहे. असे असले तरी आपली कामगिरी सुधारण्यासाठी तसेच फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘भारताचे खेळाडूही आम्हाला मिठ्या मारतात, पण अफगाणिस्तानचे मात्र…’ शोएब अख्तरने व्यक्त केली नाराजी

भारत आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नाही. आपल्या सालामीच्या लढतीत भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. तर सुपर चार फेरीमध्ये भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेविरोधातील सलग दोन सामने गमावले. याच कारणामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मात्र सुपर-४ फेरीमध्ये आज भारताचा अफगाणिस्तानविरोधात सामना आहे. अफगाणिस्तान संघाचे आव्हानदेखील संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे आजचा सामना तसा औपचारिकतेपुरता खेळला जाणार आहे. दरम्यान, हा सामना जिंकून भारत आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकतो. दिनेश कार्तिकला या स्पर्धेत पुरेशी संधी मिळालेली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात ऋषभ पंतच्या जागेवर त्याला संधी दिली जाऊ शकते. तसेच दीपक चहर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई यांना संधी देऊन त्याची कामगिरी जोखली जाऊ शकते.

हेही वाचा >>> Asia Cup 2022: पाकिस्तानच्या आसिफ अलीने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट, मैदानातच तुफान राडा

आजच्या सामन्यात केएल राहुल, हार्दिक पंड्या, या आघाडीच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. हार्दिक पंड्याने सुपर-४ फेरीमध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यात निराशा केली होती. तो आपले खातेदेखील खोलू शकला नव्हता. तसेच श्रीलंकेविरोधातील सामन्यात त्याने सुमार कामगिरी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. केएल राहुलदेखील या फेरीमध्ये खास कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे त्यालाही या सामन्यात चांगली फलंदाजी करून दाखवावी लागणार आहे. गोलंदाजी विभागात अर्शदीप सिंग, आर. अश्विन आज चांगला खेळ करतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा >>> Video : पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव करताच मैदानात राडा, प्रेक्षकांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या

भारतीय संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन/युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

अफगाणिस्तान संघाचे प्लेइंग इलेव्हन

हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जरदा, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, राशिद खान, अजमातुल्ला ओमरझाई, नवीन-उल-हक, मुजीब-उर-रेहमान, फझलहक फारुकी

हेही वाचा >>> तीन वर्षांत भारताला जगज्जेता बुद्धिबळपटू मिळण्याची शक्यता! ;विश्वनाथन आनंदचे मत

सामना कोठे पाहता येईल?

आजचा सामना स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदगी (संबंधित एचडी वाहिन्या) तसेच disney plus hotstar वरही हा सामना पाहता येईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 ind vs afg india vs afghanistan match playing 11 prd