यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताने सुपर- ४ फेरीतील श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याविरोधातील सलग दोन सामने गमावळे; ज्यामुळे भारत औपचारिकरित्या या स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र या स्पर्धेत भारताने संघ म्हणून चांगली कामगिरी केली नसली तरी, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मात्र चांगला खेळ केला. त्याने या स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील ७१ वे षटक झळकावले. तब्बल तीन वर्षांनी केलेल्या या कामगिरीचे मात्र विराट कोहलीला फारसे नवल वाटलेले नाही. आशिया चषक स्पर्धेत मला माझ्या खेळात सुधारणा करायची होती. माझे मुख्य लक्ष्य हे आगामी टी-२० विश्वचषक आहे, असे विराट कोहली म्हणाला.
हेही वाचा >> Virat Kohli Century : विराटची अफाट कामगिरी! अफगाणिस्तानविरोधात झळकावलं ७१वं शतक
विराटने शतक झळकावल्यानंतर भारतभरातील चाहते चांगलेच खूश झाले आहेत. ठिकठिकाणी त्याच्या नावाने आतषबाजी करण्यात आली. तर काही ठिकाणी केक कापण्यात आले. मात्र विराट कोहलीला त्याच्या या कामगिरीचे फारसे नवल वाटलेले नाही. त्याने “संघ म्हणून आमच्यासाठी हा क्षण खूपच विशेष असा होता. श्रीलंकेविरोधात पराभव झाल्यानंतर सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून मैदानात उतरण्याचे आम्ही ठरवले होते. ही स्पर्धा आमच्यासाठी खूपच महत्त्वाची होती. बाद फेरीमध्ये आमच्यावरील दबाव वाढला होता. या दबावाचा आम्ही सामना केला. मात्र सर्वांनाच माहिती आहे की ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा आमचे लक्ष्य आहे. आम्ही आमच्या खेळात सुधारणा करत आहोत. जे सामने आमच्यासाठी चांगले राहिले नाही, त्या सामन्यांचा आम्ही अभ्यास करू,” असे विराट कोहली म्हणाला आहे.
हेही वाचा >> Anushka Sharma : विराटने शतक झळकावताच पत्नी अनुष्काची खास पोस्ट, पतीला उद्देशून म्हणाली “कोणत्याही…”
पुढे बोलताना कोहलीने आपल्या शतकी खेळीवरही भाष्य केले. “संघ तसेच व्यवस्थापनासोबत माझा सवांद चांगला आहे. हा संवाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. माझ्या कठीण काळात हा संवाद आणि संघाने दिलेल्या अवकाशामुळे मला सुरक्षित वाायचे. जेव्हा मी परतलो तेव्हा संघासाठी काहीतरी करण्यास उत्सुक होतो,” असे म्हणत कोहलीने भारतीय संघाचे तसेच व्यवस्थापनाचे आभार मानले.