Asia Cup 2022 Latest Updates : यूएई येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत. भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आज (३१ ऑगस्ट) भारत विरुद्ध हाँगकाँग अशी लढत झाली. या लढतीत भारताने ४० धावांनी हाँगकाँगवर विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली तसेच सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी करत विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
Asia Cup 2022,INDvsHKG Live Updates | भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्याचे सर्व अपटेड्स वाचा एका क्लिकवर
भारताने हाँहकाँगवर ४० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताचे सुपर चारमधील स्थान पक्के झाले आहे.
हाँगकाँगसाठी विजयाची वाट बिकट होताना दिसत आहे. हाँगकाँगला एजाज खानच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. सध्या हाँगकाँगच्या १०६ धाव झाल्या आहेत.
भारताला बाबर हयातच्या रुपात तिसरे यश मिळाले आहे. सध्या हाँगकाँगच्या ७४ धावा झाल्या असून तीन गडी बाद झाले आहेत. बाबर हयात मैदानावर चांगलाच स्थिरावला होता. त्याने ४१ धावा केल्या.
हाँगकाँगला दुसरा मोठा धक्का बसला आहे. संघाच्या ५२ धावा झालेल्या असताना निझाकत खान धावबाद झाला आहे.
हाँगकाँगच्या ४९ धावा झाल्या असून सध्या भारताला त्यांचा एक गडी बाद करण्यात यश आले आहे.
हाँगकाँगला पहिला धक्का बसला असून यासीम मुर्तझा झेलबाद झाला आहे. सध्या हाँगकाँगच्या १२ धावा झाल्या आहेत.
भारतीय संघाचे विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव धडाकेबाज फलंदाजी करत आहेत. सध्या भारताचे दोन गडी बाद झाले असूनन १५३ धावा झाल्या आहेत.
भारताच्या ११० धावा झाल्या असून सध्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव फलंदाजी करत आहेत. विराट कोहली चांगल्याच फॉर्ममध्ये दिसतोय.
भारताला दुसरा मोठा धक्का बसला असून केएल राहुल झेलबाद झाला आहे. राहुल ३६ धावा करून तंबूत परतला. सध्या भारताच्या ९४ धावा झाल्या आहेत.
भारतीय संघाचे विराट कोहली आणि केएल राहुल धडाकेबाज फलंदाजी करत आहेत. सध्या भारताच्या ६६ धावा झाल्या असून एक गडी बाद झाला आहे.
रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला झटका बसला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कराताना तो झेलबाद झाला आहे. रोहितने २१ धावा केल्या.
भारताच्या ३३ धावा झाल्या असून हाँगकाँग संघाला अद्याप एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही.
भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले आहेत. सध्या भारताच्या पाच धावा झाल्या आहेत.
निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किनचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेचनी (यष्टीरक्षक), झिशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग
हाँगकाँग संघाने नाणेफेक जिंकली असून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला सुरुवातीला फलंदाजी करावी लागेल.
भारत विरुद्धा हाँगकाँग यांच्यातील सामन्याला काही क्षणांत सुरुवात होणार आहे. ठीक सात वजता नाणेफेक केली जाईल. नाणेफेक जिंकलीच तर भारत फलंदाजी निवडणार की गोलंदाजी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.