Asia Cup 2022 IND Vs PAK: २८ ऑगस्ट रोजी भारत व पाकिस्तानचा सामना संध्याकाळी ७. ३० वाजता सुरु होणार आहे. देशभरात या सामन्याची उत्सुकता पाहायला मिळतेय. विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. साहजिकच जगभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्याकडे डोळे लावून बसणार आहेत. आशिया चषक स्पर्धेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. डिस्ने-हॉटस्टारच्या माध्यमातूनही या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. पण समजा तुमच्याकडे या नेटवर्कचे सब्स्क्रिप्शन नसेल तरी तुम्ही नाराज व्हायची गरज नाही. उलट टीव्ही किंवा मोबाइलपेक्षा दहापट मोठ्या स्क्रीनवर आपण हा सामना पाहू शकता.. आहे की नाही कमाल?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राप्त माहितीनुसार, भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सिनेमागृहाच्या कंपनीने म्हणजेच सिनेपोलिसने आशियाई क्रिकेट परिषदेसह भागीदारी करून आशिया चषक LIVE च्या विशेष सामन्यांच्या स्क्रीनिंगची घोषणा केली. यानुसार आजचा, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आपण आपल्या शहरातील किंवा जवळपासच्या 31 सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पाहू शकता. भारत- पाक सह अन्य भारताचे अन्य महत्त्वाचे सामने सुद्धा इथे दाखवले जाणार आहेत.

कुठे करता येणार तिकीट बुकिंग?

cinepolisindia.com, Paytm आणि BookMyShow वर आपण तिकिटे बुक करू शकतात.

डोंबिवलीकरांसाठी खास पर्वणी

डोंबिवलीत सुद्धा पूजा- मधुबन या सिनेमागृहात आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे मोठ्या पडद्यावर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यासाठी आपण बुक माय शोवर तिकीट बुकिंग करू शकता. सामन्याच्यापूर्वी तिकीट उपलब्ध होताच तुम्हाला याविषयी थेट नोटिफिकेशन पाठवून सूचित केले जाईल असे बुक माय शो वर सांगण्यात आले आहे.

पूजा- मधुबन मध्ये भारत- पाकिस्तान सामना पहा (फोटो: बुक माय शो)

Asia Cup 2022: पाकिस्तानी क्रिकेटपटुंच्या ‘या’ सुंदर पत्नी सोशल मीडियावर हिट; फोटो पाहिलेत का?

दरम्यान, आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष जय शाह, यांनी या अनोख्या उपक्रमाची माहिती देत म्हंटले की, क्रिकेट पाहण्या साठी परफेक्ट माहोल बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सिनेपोलिस सारख्या आघाडीच्या सिनेमागृहाच्या साखळीसह भागीदारी करण्याचा हा अनुभव क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 ind vs pak live watch india pakistan match in cinemas check how and where to book tickets in your city svs