IND vs PAK: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद कित्येकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अलीकडेच पुन्हा एकदा हसीन जहाँ हिने नाव न घेताच मोहम्मद शमीवर पुन्हा एकदा कटू टीका केली आहे. यावेळेस तर शमीला थेट स्त्रीलंपट म्हणत तिने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. हसीन जहाँने हार्दिक पंड्याचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील फोटो शेअर करून एक अभिनंदनाची पोस्ट केली आहे. यातही शमीला घरचा आहेर द्यायला हसीन जहाँ विसरलेली नाही.

(Asia Cup: ‘जागतिक क्रिकेटमध्ये भारत लाडका कारण…’ मोहम्मद हाफीज स्पष्टच बोलला)

हसीन जहाँने हार्दिक पंड्याचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘अभिनंदन, शानदार विजय. देशाला विजय मिळवून देणाऱ्या आमच्या सिंहांचे खूप खूप आभार. देशाचा दर्जा, देशाची प्रतिष्ठा, इमानदार आणि देशभक्तांपासूनच टिकून राहते, गुन्हेगार आणि स्त्रीलंपटांमुळे नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा पाच विकेट्स राखत विजय झाला होता त्यावेळचा पंड्याचा फोटो शेअर करत हसीना जहाँन ही खास पोस्ट केली आहे. आज भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येत असताना ही पोस्ट चर्चेत आली आहे.

पाहा हसीन जहाँची पोस्ट

हसीन जहाँ व मोहम्मद शमीचे वाद काही नवीन नाहीत २०१४ मध्ये विवाहबंधनात अडकललेल्या या जोडप्याच्या नात्यात २०१८ पासून भांडणे होत आहेत. हसीन जहाँने यापूर्वी शमीवर घरगुती हिंसाचार व दुसऱ्या स्त्रीबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचे आरोप केले होते. व्हाट्सअप स्क्रिनशॉट शेअर करून तिने सोशल मीडियावर शमी किती मुलींच्या मागे लागला आहे असेही म्हंटले होते. या जोडप्याला एक मुलगी सुद्धा आहे, तिच्यासाठी शम्मी काहीच करत नाही असाही त्याच्या पत्नीचा आरोप असतो. या भांडणांनंतर तीन वर्ष होऊनही अद्याप या जोडप्याचा घटस्फोट झालेला नाही.

दरम्यान हसीन जहाँच्या पोस्टवर मोहम्मद शमीच्या चाहत्यांनी कमेंट करून शमी हा हिरा आहे त्यामुळे त्याला असे बोलण्याचा तुला हक्क नाही अशी भूमिका घेतली आहे. आशिया चषकातस शमी भारतीय संघाचा भाग नाही. आजपर्यंत भारत आशिया चषकात अपराजित आहे, आजच्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध यशस्वी घोडदौड कायम ठेवता येतेय का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader