यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील लढती चांगल्याच रोमहर्षक होत आहेत. पाकिस्तानने हाँगकाँग संघाला पराभूत करून सुपर-४ मध्ये स्थान मिळवलं आहे. पाकिस्तानच्या या विजयामुळे रविवारी (३ सप्टेंबर) भारत-पाक पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांकडून कसून सराव केला जात आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज मोहम्मद रिझवान याने मोठे विधान केले आहे. आम्ही आता कोणत्याही संघाशी दोन हात करायला तयार आहोत, असे रिझवान म्हणाला आहे.

हेही वाचा>>>> IPLमधील आघाडीच्या संघाने बदलला ‘हेड कोच’, आता ब्रायन लारा देणार खेळाडूंना प्रशिक्षण

“जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात समना होतो, तेव्हा तेव्हा दोन्ही संघ दबावात असतात. संपूर्ण जग या सामन्याची वाट पाहात असते. भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना हा अंतिम सामन्यासारखा खेळला जातो. त्यामुळे आगामी सामन्यासाठी आमच्या सर्वच खेळाडूंचा आत्मविश्वास बळावला असून आम्ही कोणत्याही विरोधी संघाला तोंड देण्यास सज्ज आहोत,” असे रिझवान म्हणाला आहे.

हेही वाचा>>>> अनुष्का शर्माच्या फोटोवर केलेल्या ‘त्या’ कमेंटमुळे डेव्हिड वॉर्नर ट्रोलर्सच्या निशाण्यावर; विराट कोहली म्हणाला…

मोहम्मद रिझवानने हाँगकाँगविरोधात झालेल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्याने ५७ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या होत्या. ६ चौकार आणि १ षटकार यांच्या जोरावर त्याने ही धावसंख्या गाठली होती. या सामन्यात त्याने टी-२० सामन्यातील ५००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानमधील ७ वा खेळाडू ठरला.

हेही वाचा>>>> Asia Cup: ‘जागतिक क्रिकेटमध्ये भारत लाडका कारण…’ मोहम्मद हाफीज स्पष्टच बोलला

दरम्यान, येत्या रविवारी (३ सप्टेंबर) भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. याआधी भारत-पाक यांच्यात २८ ऑगस्ट रोजी लढत झाली होती. या सामन्यात भारताने ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. भारताच्या हार्दिक पंड्या-रविंद्र जडेजा या जोडीने दमदार फलंदाजी करत विजय खेचून आणला होता.

Story img Loader