यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत सध्या अटीतटीच्या लढती होत आहेत. सध्या सुपर-४ फेरीतील सामने खेळवले जात आहेत. ४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात भारताचा पराभव झाला. याच कारणामुळे सध्या भारतीय संघापुढे ‘करो या मरो’ची स्थिती निर्माण झाली आहे. भारताला या स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवायचे असेल, तर ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीलंकेविरोधातील सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवणे आवश्यक आहे.
हेही वाचा >>> INV vs PAK Virat Kohli : ‘…वाटले आता करिअर संपले’ विराट कोहलीने सांगितला ‘तो’ जुना प्रसंग, म्हणाला “रात्रभर…”
सुपर-४ फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामने खेळवले जात आहेत. या फेरीमध्ये हे चारही संघ एकदा एकमेकांसमोर येणार आहेत. भारताने या फेरीतील पहिला सामना गमावला आहे. तर ६ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि ८ सप्टेंबर रोजी अफागणिस्ताविरोधात भारताची लढत होणार आहे. सुपर-४ फेरीमध्ये गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळावला जाणार आहे. याच कारणामुळे भारताला आगामी दोन्ही सामन्यामंध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. अन्यथा या दोनपैकी एकाजरी सामन्यात भाराताचा पराभव झाला तर अन्य संघांच्या कामगिरीवर भारताला अवलंबून राहावे लागणार आहे.
IND vs PAK : पाकिस्तानच्या मुलींमध्ये कोहलीची क्रेझ, भारत-पाक सामन्यातील ‘या’ खास फोटोची होतेय चर्चा
भारतापुढे पेच काय?
भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हाँगकाँगविरोधातील सामन्यात जायबंदी झाल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. भारताचा हा हुकुमी एक्का गमवावा लागल्यामुळे कॅप्टन रोहित शर्मासमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे. जडेजाच्या जागेवर एका सामन्यात दीपक हुडाला संधी दिली गेली. मात्र तो चांगली कामगिरी करू शकला नाही. तसेच पाकिस्तानविरोधातील सामन्यात हार्दिक पंड्यादेखील सपशेल अपयशी ठरला. त्याला खातेदेखील खोलता आले नाही. याच कारणामुळे श्रीलंकेविरोधात सर्वोत्तम संघाची निवड करण्याचे दिव्य रोहित शर्मासमोर असेल.